IMPIMP

Indapur News | इंदापूर उपजिल्हा रूग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक सुहास शेळकेंवर निलंबनाची कारवाई करावी – भाजप

by nagesh
Indapur News | Medical Superintendent in charge of Indapur Sub-District Hospital Suhas Shelke should be suspended - BJP

इंदापूर : सरकारसत्ता ऑनलाइन –  Indapur News | (सुधाकर बोराटे) – इंदापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) वतीने शहरातील नागरिकांसाठी वाॅर्डनिहाय कोविड लसीकरण मोहिम सुरू असून सदरची लसीकरण मोहीम ही बेकायदेशिर व चुकीची असुन उपजिल्हा रूग्णालयाचे प्रभारी वैद्यकिय अधिक्षक डॉ. सुहास शेळके (dr. suhas shelke) हे शासकिय नियमांचे उल्लंघन करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जाणीवपूर्वक मदत करत असल्याने डाॅ. सुहास शेळके यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन इंदापूर शहर (Indapur News) भाजपच्या (BJP) वतीने तहसिलदार श्रीकांत पाटील (shrikant patil tahsildar) यांना देण्यात आले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

निवेदनात म्हटले आहे की,इंदापूर शहरात राष्ट्रवादी काग्रेस पक्षाच्या वतीने दि. ०८ ते १९ आॅक्टोंबर या कालावधीत शहराच्या विविध भागात नागरिकांसाठी लसीकरण मोहिम सुरू करण्यात आलेली आहे. सोशल मिडिया व जाहिरातीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने याबाबत प्रसिध्दी केलेली आहे. तसेच यासाठी लस पुरवठा हा उपजिल्हा रूग्णालयाच्या माध्यमातून देण्यात येत आहे. वास्तविक पाहता सदरचा लस पुरवठा हा चुकीच्या पद्धतीने व बेकायदेशिररित्या देण्यात येत असुन प्रभारी वैद्यकीय अधिक्षक सुहास शेळके हे राजकीय पक्षाला जाणीवपुर्वक मदत करत असल्याचे निदर्शनास येत आहे.

पूणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद (ayush prasad ceo pune) यांनी नगरपरिषदेच्या कामाचे कौतुक केले आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (pune district central cooperative bank) सभागृहात तालुका आढावा बैठकीत नगरपरिषदेने दत्तात्रय भरणे (dattatray bharane),
प्रांत अधिकारी दादासाहेब कांबळे (Dadasaheb Kamble) यांच्याकडे शहरात लसीकरण मोहिम राबवावी यासाठी सहकार्य करण्याची मागणी वारंवार करण्यात आलेली होती.
परंतु यास लोकप्रतीनीधी व वरिष्ठ शासकीय अधिकारी यांनी केराची टोपली दाखवून उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ.सुहास शेळके यांना छुपे पाठबळ देत असल्याचे दीसुन येत आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

डॉ. सुहास शेळके यांची सेवा कारकीर्द ही आनेकवेळा वादग्रस्त ठरलेली आहे.असे असताना वादग्रस्त अधिकारी सुहास शेळके यांना राष्ट्रवादीच पाठीशी घालत असुन अशा अधिकार्‍याचे तात्काळ निलंबन होणे गरजेचे असल्याचे निवेदनात (Indapur News) म्हटले आहे.
यावेळी शहर भाजपचे अध्यक्ष शकीलभाई सय्यद, नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, इंदापूर तालुका भाजपा ओबीसी मोर्चाचे पांडुरंग (तात्या )शिंदे,
नगरपरिषदेचे गटनेते नगरसेवक कैलास कदम, नगरसेवक जगदीश मोहिते, माजी नगरसेवक गोरख शिंदे,सुनील आरगडे तसेच जावेद शेख, अभिजित अवघडे,
सागर अरगडे, संदीप चव्हाण, असलम शेख, आबासाहेब थोरात, अक्षय राऊत, विकी खुडे ,अशोक व्यवहारे यावेळी उपस्थित होते.

 

Web Title : Indapur News | Medical Superintendent in charge of Indapur Sub-District Hospital Suhas Shelke should be suspended – BJP

 

हे देखील वाचा :

World egg day 2021 | अंड्यासोबत चुकूनही खाऊ नका ‘या’ 5 गोष्टी, आरोग्यासाठी अतिशय धोकादायक; जाणून घ्या

Benefits of Clapping | टाळी वाजवण्याचे ‘हे’ 4 आश्चर्यकारक फायदे माहिती आहेत का?, जाणून घ्या

Gram Suraksha Yojana | पोस्ट ऑफिसची ‘स्कीम’ ! 1500 रुपये महिना करा जमा, मिळतील 35 लाख रुपये; जाणून घ्या

 

Related Posts