IMPIMP

Indrani Balan Winter T-20 League | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; पुनित बालन ग्रुप, न्युट्रीलिशियस्, पुना क्लब, एमईएस क्रिकेट क्लब उपांत्य फेरीत

by nagesh
Indrani Balan Winter T-20 League | 2nd 'Indrani Balan Winter T20 League' Championship Cricket Tournament; Punit Balan Group, Nutrilicious, Pune Club, MES Cricket Club in semi finals

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Indrani Balan Winter T-20 League | पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित दुसर्‍या ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत पुनित बालन ग्रुप, न्युट्रीलिशियस्, पुना क्लब आणि एमईएस क्रिकेट क्लब या संघांनी आपापल्या गटामध्ये अव्वल गुण मिळवत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. (Indrani Balan Winter T-20 League)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सहकारनगर येथील ल. रा. शिंदे हायस्कूल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार्‍या निर्णायक सामन्यामध्ये सिद्धार्थ म्हात्रे याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पुनित बालन ग्रुप संघाने इऑन वॉरीयर्स संघाचा ४ गडी राखून पराभव केला आणि उपांत्य फेरी गाठली. पहिल्यांदा फलंदाजी करताना इऑन वॉरीयर्स संघाने मयांक कश्यप (४० धावा), आदित्य सुर्यवंशी (४३ धावा) आणि अभिमन्यु सिंग (३० धावा) यांच्या फलंदाजीच्या जोरावर १६९ धावांचे आव्हान उभे केले. पुनित बालन ग्रुप संघाने हे आव्हान १८.३ षटकात व ६ गडी गमावून पूर्ण केले. सिद्धार्थ म्हात्रे याने नाबाद ५५ धावांची खेळी केली. यासह प्रीतम पाटील (३८ धावा), ओंकार खाटपे (२१ धावा) आणि मेहूल पटेल (२१ धावा) यांनी उपयुक्त फलंदाजी करून संघाचा विजय सोपा केला. (Indrani Balan Winter T-20 League)

 

ओंकार येवले याच्या नाबाद ७६ धावांच्या जोरावर औरंगाबादच्या व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाने पुनित बालन केदार जाधव अ‍ॅकॅडमी संघाचा ७ गडी राखून पराभव केला.

 

स्पर्धेच्या अ गटातून एमईएस क्रिकेट क्लबने १२ गुण आणि सरस धावगतीव्दारे (३.०९८) पहिले तर, पुनित बालन ग्रुपने १२ गुणांसह (२.८९८ धावगती) दुसरे स्थान मिळवले. ब गटामध्ये न्युट्रीलिशियस संघाने १० गुण आणि सरस धावगतीव्दारे (१.१९५) पहिले तर, पुना क्लबने १० गुणांसह (०.६५२ धावगती) दुसरे स्थान मिळवले.

 

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
इऑन वॉरीयर्सः २० षटकात १० गडी बाद १६९ धावा (मयांक कश्यप ४०, आदित्य सुर्यवंशी ४३, अभिमन्यु सिंग ३०,
सागर सावंत २-२८, यश खलदकर २-२८) पराभूत वि. पुनित बालन ग्रुपः १८.३ षटकात ६ गडी बाद १७२ धावा
(सिद्धार्थ म्हात्रे नाबाद ५५ (४०, ५ चौकार, २ षटकार), प्रीतम पाटील ३८, ओंकार खाटपे २१, मेहूल पटेल २१,
मयांक कश्यप २-३६); सामनावीरः सिद्धार्थ म्हात्रे;

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पुनित बालन केदार जाधव अ‍ॅकॅडमीः १८ षटकात ६ गडी बाद १६० धावा (अभिमन्यु जाधव नाबाद ७२ (५२, ७ चौकार,
२ षटकार), अक्षय चव्हाण नाबाद ३९, सागर पांडे ३-२०) पराभूत वि. व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमीः १६.३ षटकात ३
गडी बाद १६५ धावा (ओंकार येवले नाबाद ७६ (४३, ९ चौकार, २ षटकार), अक्षय लोखंडे ४९, शुभम वेलणकर २-३५);
सामनावीरः ओंकार येवले;

 

 

Web Title :- Indrani Balan Winter T-20 League | 2nd ‘Indrani Balan Winter T20 League’ Championship Cricket Tournament; Punit Balan Group, Nutrilicious, Pune Club, MES Cricket Club in semi finals

 

हे देखील वाचा :

Uddhav Thackeray | पाशवीवृत्ती संपूर्ण देशाला खावून टाकेल, बीबीसीच्या कार्यालयावरील धाडीवरुन उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर घणाघात

Maharashtra BJP | फडणवीस हे दहावे आश्चर्य म्हणणाऱ्या संजय राऊतांना भाजपाचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘अहो, उंटावरचे शहाणे…’

WPL Auction 2023 | महिला आयपीएलच्या लिलावात कोणत्या खेळाडूवर किती बोली लागली? जाणून घ्या

 

Related Posts