IMPIMP

Inflation | सोने-चांदी आणि पामतेल पुन्हा एकदा महागले

by nagesh
Gold-Silver Rate Today

मुंबई :सरकारसत्ता ऑनलाईन – भारतीयांसाठी दुष्काळात तेरावा महिना येणार आहे. कारण, महागाईतून (Inflation) नुकतेच लोक सावरत आहेत, तोपर्यंत पुन्हा एकदा सोने, चांदी आणि पामतेलाच्या किंमती वाढणार आहेत. जागतिक बाजारपेठेत वस्तूंच्या किंमतीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे भारत सरकारने सोने, चांदी आणि पामतेलाच्या बेस इम्पोर्ट (Base Import) किंमतीत वाढ केली आहे. यामुळे देशांतर्गत बाजारातील त्यांच्या किमतींवरही (Inflation) परिणाम दिसून येणार आहे.

 

सरकारने काही काळ खाद्य तेलांच्या किंमतीत घट केली होती. पण पुन्हा जागतिक बाजारपेठ उसळी घेत असल्याने किंमती वाढणार आहेत. कच्च्या पामतेलाची बेस इम्पोर्ट किंमत आत्तापर्यंत 952 डॉलर प्रति टन होती. ती आता 960 डॉलर प्रति टन झाली आहे. आरबीडी पामतेलाची बेस इम्पोर्ट किंमत देखील 962 डॉलरवरून 988 डॉलर प्रति टन करण्यात आली आहे. आरबीडी पामोलीनची किंमत काही दिवसांपूर्वी 971 डॉलर प्रति टन होती.
तिच्यात आता वाढ होऊन ती 1008 डॉलर प्रति टन झाली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

भारत सरकारने सोने आणि चांदीच्या बेस इम्पोर्ट (Base Import) किंमती देखील वाढविल्या आहेत.
सोने 531 डॉलर प्रति 10 ग्रॅमवरून 570 डॉलर प्रति 10 ग्रॅम एवढे झाले आहे. तर चांदी 630 डॉलर प्रति
किलोवरुन 702 डॉलर प्रति किलो झाली आहे.

 

 

Web Title :- Inflation | gold silver palm oil price may be high government big decision gh

 

हे देखील वाचा :

Pune-Goa Road Accident | पुण्यातील बुलेट रायडर तरुणाचा मुंबई-गोवा महामार्गावर अपघाती मृत्यू

PM Narendra Modi | नरेंद्र मोदींची पाकिस्तानवर नाव न घेता जोरदार टीका; “दहशदवाद हे काही देशांचे परराष्ट्र धोरण” आंतरराष्ट्रीय परिषदेला करत होते संबोधित

Pune Pimpri Crime | वीस वर्षाच्या तरुणीसोबत मैत्री करुन लैंगिक अत्याचार, चाकणमधील घटना

 

Related Posts