IMPIMP

PM Narendra Modi | नरेंद्र मोदींची पाकिस्तानवर नाव न घेता जोरदार टीका; “दहशदवाद हे काही देशांचे परराष्ट्र धोरण” आंतरराष्ट्रीय परिषदेला करत होते संबोधित

by nagesh
Modi Government | good news for ration card holders 150 kg of grain will be free the government made a big announcement

दिल्ली : वृत्तसंस्था – आज दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय ‘दहशदवादाला पैसे नको’ (No Money For Terror) ही परिषद पार पडली. या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) संबोधित केले. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी पाकिस्तानचे (Pakistan) नाव न घेता त्यावर जोरदार टीका केली. काही देशांसाठी दहशदवाद (Terrorism) पोसणे आणि तो निर्यात करणे हा त्यांच्या परराष्ट्रीय धोरणाचा (Foreign Policy) भाग आहे, अशी टीका नरेंद्र मोदींनी पाकिस्तानचे नाव न घेता केली आहे.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याशिवाय आंतरराष्ट्रीय समुदायाने (International Community) दहशदवादात कोणताही भेदभाव करू नये अशी मागणीही नरेंद्र मोदींनी केली. सर्व दहशदवादी हल्ल्याना सारख्याच नजरेने पाहिले पाहिजे. त्यात आवड निवड करू नये. आमचा तो दहशदवादी (Terrorist) आणि तुमचा तो क्रांतिकारी अशी दुट्टपी भूमिका कोणीही घेऊ नये अशी मागणी पंतप्रधानांनी केली. दहशद वाद ही जागतिक समस्या असून जगाने एकत्र येऊन याला सामोरे गेले पाहिजे असेही मोदी (PM Narendra Modi) म्हणाले. ‘जगभरात कुठेही, कसाही दहशतवादी हल्ला झाला तर तो दहशतवादी हल्ला असतो, हे लक्षात घेऊन प्रतिक्रिया दिली पाहिजे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठामपणे सांगितले. अनेकदा, दहशतवादी हल्ला झाला किंवा कारवाई कोणी केली, हे समोर ठेऊन अनेक देश त्याची टीका करत असतात.

 

जगभरातील अनेक दहशतवादी संघटनांना वेगवेगळ्या सरकारांकडूनच पैसा पुरवला जात आहे.
हे देश दहशतवादाला फक्त आर्थिक नाही तर वैचारिक समर्थन देतात, असा आरोप त्यांनी पाकिस्तानचा थेट उल्लेख न करता केला.
दहशतवाद्यांना आश्रय देणे आणि दहशतवादाला प्रोत्साहन देण्यात काहीही फरक नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या संबोधनात पाकिस्तानचा स्पष्ट उल्लेख नसला,
तरी त्यांचा निशाणा पाकिस्तानातून वाढून भारतात दहशदवादी कारवाया करणाऱ्या संघटनांकडे होता हे स्पष्ट आहे.

 

शिवाय, दहशदवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या अशा देशांना आंतरराष्ट्रीय समुदायाने बहिष्कृत केले पाहिजे,
असे आवाहनही त्यांनी केले. झपाट्याने झालेल्या तंत्रज्ञानाच्या विकासामुळे दहशदवादी संघटना वेगवेगळ्या
पद्धतीने आर्थिक साहाय्य मिळवत आहेत. शिवाय ही मदत एखाद्या देशाच्या सहकार्याशिवाय होणार नाही,
हे ही मोदींनी स्पष्ट केले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- PM Narendra Modi | prime minister narendra modi direct attack on pakistan stated pm harassment to terrorism is part of the foreign policy of many countries

 

हे देखील वाचा :

Indrani Balan Winter T20 League 2022 | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा

Pune Pimpri Crime | वीस वर्षाच्या तरुणीसोबत मैत्री करुन लैंगिक अत्याचार, चाकणमधील घटना

Modi Government | ‘या’ कायद्यामुळे नाही चोरता येणार चीनला तुमचा डेटा; मोदी सरकार लवकरच मांडणार नवीन विधेयक

 

Related Posts