IMPIMP

Jalgaon ACB Trap | माती वाहतूक करणाऱ्याकडू दीड लाख रुपये लाच घेताना सर्कल व तलाठी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

by nagesh
ACB Trap News | Anti-corruption Bureau Nanded: Women sarpanch and gram sevak caught in anti-corruption net while fleeing after taking bribe

जळगाव :  सरकारसत्ता ऑनलाइन जप्त केलेला डंपर सोडण्यासाठी दीड लाख रुपये लाच घेताना (Accepting Bribe) सर्कल (मंडळ अधिकारी) व अमळनेर शहर तलाठी यांना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Jalgaon ACB Trap) सापळा रचून रंगेहाथ पकडले. जळगाव एसीबीच्या पथकाने (Jalgaon ACB Trap) ही कारवाई गुरुवारी (दि.13) तलाठी कार्य़ालयात दुपारी एकच्या सुमरास केली.

 

अमळनेर येथील मंडळ अधिकारी दिनेश शामराव सोनवणे Dinesh Shamrao Sonwane (वय-48) आणि शहर तलाठी गणेश राजाराम महाजन Ganesh Rajaram Mahajan (वय-46) अशी लाचखोरांची नावे आहेत. याबाबत अमळनेर येथील 30 वर्षाच्या तक्रारदाराने जळगाव एसबीकडे (Jalgaon ACB Trap) बुधवारी (दि.12) तक्रार केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

तक्रारदार यांचा अमळनेरला बिल्डिंग मटेरियल सप्लायर्सचा (Building Material Suppliers) व्यवसाय आहे. या व्यवसायासाठी त्यांच्याकडे स्वत:च्या मालकीचे 3 डंबर व करारनामा करुन घेतलेले 3 डंपर आहेत. त्यापैकी करारनामा करुन घेतलेल्या डंपरमधून माती वाहतूक करताना डंपर जप्त करुन तहसील कार्यालयात जमा करण्यात आला होता. हा डंपर सोडण्याच्या मोबदल्यात सोनवणे आणि महाजन यांनी तक्रारदार यांच्याकडे दीड लाख रुपये लाच मागितली. याबाबत तक्रारदार यांनी जळगाव एसबीकडे बुधवारी तक्रार केली. जळगाव एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता, तक्रारदार यांचा डंपर सोडवण्यासाठी सोनवणे आणि महाजन यांनी दीड लाख रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. आज अमळनेर तलाठी कार्यालयात सापळा रचून तलाठी गणेश महाजन यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

 

ही कारवाई ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने (SP Sunil Kadasane),
अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे (Addl SP Narayan Nyahalde),
पोलीस उपअधीक्षक सतीश भामरे (Deputy Superintendent of Police Satish Bhamare)
यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलीस उप अधीक्षक शशिकांत एस. पाटील (DySP Shashikant S. Patil)
पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव (Police Inspector NN Jadhav), संजोग बच्छाव (Police Inspector Sanjog Bachhav),
पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील (PSI Dinesh Singh Patil),
सुरेश पाटील (PSI Suresh Patil), पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक अहीरे, सुनील पाटील, रवींद्र घुगे,
महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल शैला धनगर, पोलीस नाईक जनार्धन चौधरी, किशोर महाजन,
बाळु मराठे, सुनील वानखेडे, महेश सोमवंशी,
ईश्वर धनगर प्रदिप पोळ, राकेश दुसाने, सचिन चाटे, प्रणेश ठाकुर, अमोल सुर्यवंशी यांच्या पथकाने केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Jalgaon ACB Trap | Circle and Talathi in anti-corruption net while accepting a bribe

 

हे देखील वाचा :

T20 World Cup 2022 | भारतासह ‘हे’ तीन संघ असणार सेमीफायलनमध्ये, माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री वर्तवलं भविष्य

Andheri East by-Election | हायकोर्टाने फटकारले, कुहेतू ठेवून ऋतुजा लटकेंचा राजीनामा स्वीकारण्यास दिरंगाई; उद्या पत्र द्या, शिंदे गटाला मोठा धक्का

Eknath Khadse | मित्र पक्षाबाबत एकनाथ खडसेंचे वक्तव्य, म्हणाले – शिंदे व उद्धव ठाकरेंच्या भानगडीत बाळासाहेबांची पुण्याई…

 

Related Posts