IMPIMP

Eknath Khadse | मित्र पक्षाबाबत एकनाथ खडसेंचे वक्तव्य, म्हणाले – शिंदे व उद्धव ठाकरेंच्या भानगडीत बाळासाहेबांची पुण्याई…

by nagesh
Eknath Khadse | eknath khadse reacted to the controversy between eknath shinde and uddhav thackeray

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाइन शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटात (Shinde Group) सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या दोघांच्या भानगडीत बाळासाहेबांची (Balasaheb Thackeray) पुण्याई बंद पडली. आपला मित्र पक्ष मजबूत असला तर आपण ही मजबूत असू शकतो. आपल्या महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) पक्षातील घटक हा मजबूत असला पाहिजे. ते जळगावमधील बोदवड येथील एका कार्यक्रमात एकनाथ खडसे (Eknath Khadse) बोलत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

एकनाथ खडसे (Eknath Khadse) म्हणाले, तीन पक्ष मिळून सरकार येऊ शकते हे शरद पवारांनी (Sharad Pawar) करून दाखवले होते. शिंदे सरकार (Shinde Government) येईल असे वाटले नव्हते. त्यामुळे आपलेही तीन पक्षाचे सरकारी येईल असेही वाटले नव्हते. मात्र चमत्कार करणारा महापुरुष शरद पवार हे आपल्यामध्ये आहेत. आपले सरकार राज्यामध्ये येण्यासाठी तीन पक्ष मिळून एकत्र लढावे लागेल.

 

ते पुढे म्हणाले, महाराष्ट्रात महाविकास आघाडीने एकत्र निवडणुका लढवल्या तर भाजपाचा (BJP) धुव्वा उडाल्याशिवाय राहणार नाही. घोडा मैदान जवळ आहे, साधारण दोन-तीन आमदार आपल्याकडे अधिक असते तर आपलाच मुख्यमंत्री झाला असता. आपला पक्ष मजबूत केला पाहिजे आणि तो पहिल्या क्रमांकावर आला पाहिजे.

 

दरम्यान, शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट निर्माण झाले.
त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारही कोसळले आणि शिंदे-फडणवीस सरकार
(Shinde-Fadnavis Government) अस्तित्वात आले. दुसरीकडे शिंदे आणि ठाकरे गटातील वाद टोकाला गेला,
पक्षाचे नाव, चिन्ह यावरून जोरदार रस्सीखेच सुरू झाली.
प्रकरण न्यायालायत गेले आणि आता अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या (Andheri East by-Election) पार्श्वभूमीवर दोन्ही गटांना शिवसेनेचे मूळ धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने नाकारले.
शिवाय, फक्त शिवसेना हे नावही दोन्ही गटांना वापरता येणार नसल्याने त्यांना नवीन नावे देण्यात आली आहेत.
या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे बोलत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title – Eknath Khadse | eknath khadse reacted to the controversy between eknath shinde and uddhav thackeray

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics | मंत्री उदय सामंतांना आगामी निवडणूक सोपी नाही, शिवसेना उभे करू शकते राजन साळवींचे आव्हान?

Womens Asia Cup 2022 | दीप्ती शर्माच्या फिरकीच्या जोरावर मलेशियावर 74 धावांनी विजय मिळवत भारताची फायनलमध्ये धडक

Amravati ACB Trap | 5 हजार रुपये लाच मागणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यासह हवालदारावर एसीबीकडून FIR

 

Related Posts