IMPIMP

Andheri East by-Election | हायकोर्टाने फटकारले, कुहेतू ठेवून ऋतुजा लटकेंचा राजीनामा स्वीकारण्यास दिरंगाई; उद्या पत्र द्या, शिंदे गटाला मोठा धक्का

by nagesh
Andheri East by-Election | bmc delayed accepting rutuja latkes resignation with ulterior motives the mumbai high court made a serious observation

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील (Andheri East by-Election ) शिवसेनेच्या उमदेवार आणि दिवंगत आमदार रमेश लटके (Shivsena MLA Ramesh Latke) यांच्या पत्नी मुंबई महापालिका प्रशासनात कार्यरत होत्या, निवडणुकीसाठी (Andheri East by-Election) त्यांना नोकरीचा राजीनामा (Resignation) देणे आवश्यक आहे. मात्र, ऋतुजा लटके (Rituja Latke) यांचा राजीनामा मंजूर करण्यात प्रशासनाने चालढकल चालवली होती. इकडे उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. अशा स्थितीत शिवसेनेने मुंबई हायकोर्टात (Bombay High Court) धाव घेतली आणि अखेर न्यायालतून लटके यांना दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने आज महापालिका प्रशासनावर कडक शब्दात ताशेरे ओढले, आणि कुहेतुने राजीनामा स्वीकारण्यास दिरंगाई केल्याचे म्हटले. यामुळे मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) प्रशासनाचा करभार चव्हाट्यावर आला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शिंदे-फडणवीस सरकारच्या (Shinde-Fadnavis Government) दबावामुळे मुंबई महापालिका आयुक्त हे ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. आज मुंबई हायकोर्टाने सुद्धा कुहेतुने राजीनामा स्वीकारण्यास दिरंगाई केल्याचे ताशेरे ओढले.

 

लटके यांच्या याचिकेवर आज झालेल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने मुंबई महापालिकेच्या कारभारावर कडक शब्दांत ताशेरे ओढत उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत राजीनामा स्वीकारल्याचे पत्र लटके यांना देण्याचे निर्देश पालिकेला दिले आहेत. यावेळी पालिकेतर्फे युक्तिवाद करताना ज्येष्ठ वकील अनिल साखरे (Senior Advocate Anil Sakhre) यांनी ऋतुजा लटके यांचा राजीनामा न स्वीकारण्यामागील कारणे सांगितली.

 

अ‍ॅड. साखरे यांनी म्हटले, राजीनामा विशिष्ट तारखेला किंवा विशिष्ट दिवसांत स्वीकारावा, असे म्हणण्याचा कर्मचार्‍याला अधिकार नाही. तो कधी स्वीकारायचा हा अधिकार नोकरी देणार्‍याचा असतो. अशा प्रकरणांत कोर्टालाही आदेश देण्याचा अधिकार नसतो. नोटीस कालावधी माफ करून राजीनामा स्वीकारायचा की राजीनामा नाकारायचा हा सर्वस्वी पालिका आयुक्तांचा विशेषाधिकार आहे, साखरे यांनी म्हटले. मात्र, अंतरिम आदेश देताना मुंबई हायकोर्टाने अत्यंत कडक शब्दांत पालिका प्रशासनावर ताशेरे ओढले.

 

न्यायमूर्ती नितीन जामदार (Justice Nitin Jamdar) व न्यायमूर्ती शर्मिला देशमुख (Justice Sharmila Deshmukh) यांच्या खंडपीठाने आपले गंभीर निरीक्षण नोंदवताना म्हटले की, महापालिका आयुक्तांना (Municipal Commissioner) विशेषाधिकार असला तरी तो योग्य व वाजवी पद्धतीने वापरायचा असतो. अन्यथा तेही न्यायिक तपासणीच्या अधीन येते. या प्रकरणात कुहेतू मनात ठेवून आणि मनमानी पद्धतीने राजीनामा पत्र स्वीकारण्यात दिरंगाई केली असल्याचे दिसत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ऋतुजा लटके यांच्याविरोधात लाच घेतल्याची एक तक्रार प्रलंबित आहे,
अशी माहिती महापालिकेच्या वकिलांनी आज हायकोर्टाला दिली.
त्यानंतर याबद्दल ऋतुजा यांच्या वकिलांनी तीव्र आक्षेप घेतला. यावरून पूर्णपणे स्पष्ट होते
की, ऋतुजा लटके यांना पोटनिवडणूक लढवता येऊ नये,
एवढाच पालिकेचा हेतू असल्याचा आरोप ऋतुजा यांचे वकील विश्वजीत सावंत यांनी केला.

 

त्यानंतर कर्मचार्‍याला निवडणूक लढवण्यास काही आडकाठी आहे का? असा प्रश्न हायकोर्टाने ऋतुजा यांचे वकीत विश्वजीत सावंत यांना केला.
त्यावर सावंत म्हणाले की, ’हो, लाभाचे पद असल्यास निवडणूक (Andheri East by-Election) लढवता येत नाही आणि
ऋतुजा यांनी उमेदवारी अर्ज भरला तरी त्या कारणाखाली तक्रार होऊ शकते
आणि अर्ज बाद होऊ शकतो. तो धोका आम्हाला पत्करायचा नाही.

आज सुनावणीस सुरुवात झाल्यानंतर हायकोर्टाने पालिकेच्या कामाबद्दल सुरुवातीलाच कठोर निरीक्षण नोंदवले.
न्यायालयाने म्हटले. फक्त कर्मचारी आणि नोकरी देणारे यांच्यातील हा प्रश्न आहे.
एखाद्या कर्मचार्‍याला निवडणूक लढवायची आहे तर राजीनाम्याबाबत निर्णय घेण्यात पालिकेला अडचण काय आहे?

 

कोर्टाने म्हटले, महापालिका आयुक्त नोटीस कालावधी माफ करण्याचा आपल्या विशेषाधिकारातही निर्णय घेऊ शकतात.
फक्त कर्मचारी व नोकरी देणारे यांच्यातील हा प्रश्न आहे.
महापालिका आयुक्त नोटीस कालावधी माफ करण्याचा आपल्या विशेषाधिकारातही निर्णय घेऊ शकतात.
हा प्रश्न हायकोर्टात येण्याचीही आवश्यकता नव्हती.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Andheri East by-Election | bmc delayed accepting rutuja latkes resignation with ulterior motives the mumbai high court made a serious observation

 

हे देखील वाचा :

Eknath Khadse | मित्र पक्षाबाबत एकनाथ खडसेंचे वक्तव्य, म्हणाले – शिंदे व उद्धव ठाकरेंच्या भानगडीत बाळासाहेबांची पुण्याई…

Maharashtra Politics | मंत्री उदय सामंतांना आगामी निवडणूक सोपी नाही, शिवसेना उभे करू शकते राजन साळवींचे आव्हान?

Womens Asia Cup 2022 | दीप्ती शर्माच्या फिरकीच्या जोरावर मलेशियावर 74 धावांनी विजय मिळवत भारताची फायनलमध्ये धडक

 

Related Posts