IMPIMP

Jan Samarth Portal | ‘जन समर्थ पोर्टल’चे PM मोदींच्या हस्ते उद्घाटन; नेमकं ‘हे’ पोर्टल आहे तरी काय ? जाणून घ्या

by nagesh
Jan Samarth Portal | pm narendra modi launched jan samarth portal know details

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Jan Samarth Portal | केंद्रातील मोदी सरकारकडून (Modi Government) नागरिकांसाठी एक ‘जन समर्थ पोर्टल’ (Jan Samarth Portal) सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून सरकारच्या विविध योजना आणि या योजनांनुसार कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते या पोर्टलचे सोमवारी उद्घाटन करण्यात आले आहे. क्रेडिट – लिंक्ड सरकारी योजनांसाठी (Government Schemes) हे एक राष्ट्रीय पोर्टल आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

“जन समर्थ पोर्टल’ (Jan Samarth Portal) लॉन्च हे पोर्टल केवळ विद्यार्थी, उद्योजक, व्यापारी, शेतकरी यांचे जीवन सुकर करेल असे नाही तर त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यातही मदत करणार आहे. विद्यार्थ्यांना कोणत्या सरकारी योजनेचा सर्वाधिक फायदा होईल हे त्यांना कळेल आणि आम्ही त्याचा कसा फायदा घेऊ शकतो हे देखील कळेल. तरुण, मध्यमवर्गीयांसाठी एंड – टू – एंड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म म्हणून हे पोर्टल काम करेल. स्वयंरोजगारात महत्त्वाची भूमिका बजावेल.” असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं आहे.

 

“विविध मंत्रालयांच्या वेगवेगळ्या वेबसाइटला भेट देण्याऐवजी भारत सरकारच्या एका पोर्टलवर पोहोचणे चांगले आहे आणि तिथेच समस्या सोडवली गेली पाहिजे. याच ध्येयाने ‘जन समर्थ पोर्टल’ आज सुरू केलेय. 21 व्या शतकातील भारत लोककेंद्रित प्रशासनाच्या दृष्टिकोनातून प्रगती करत आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षांच्या प्रदीर्घ विकास प्रवासाचाही त्यांनी उल्लेख केला आणि स्वातंत्र्यलढ्यातील वीरांचे स्मरण देखील केल्याचे,” मोदी म्हणाले.

 

 

‘जन समर्थ पोर्टल’ म्हणजे काय ?
जन समर्थ हे एक डिजिटल पोर्टल आहे. जिथे 13 क्रेडिट लिंक्ड सरकारी योजना एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. डिजीटल पद्धतीने लाभार्थी आपली पात्रता तपासू शकतात. पात्र योजनांमध्ये डिजिटल अर्ज करता येऊ शकतो.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

अर्ज कोण करु शकतो ?

भारतातील कोणताही नागरिक यासाठी अर्ज करू शकतो.

पात्रतेनुसार कर्जाच्या श्रेणी बदलतील, त्यानुसार तुम्हाला अर्ज करावा लागेल.

योजना, कर्जासाठी पात्र तुम्ही असाल तर ऑनलाइन माध्यमातून कर्जासाठी अर्ज करू शकता.

 

आवश्यक कागदपत्रे –

आधार क्रमांक
मतदार ओळखपत्र
पॅन कार्ड
बँक स्टेटमेंट

 

Web Title :- Jan Samarth Portal | pm narendra modi launched jan samarth portal know details

 

हे देखील वाचा :

Corona in Maharashtra | मंत्री विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान; म्हणाले – ‘सध्याची कोरोना रूग्णसंख्या वाढ हे चौथ्या लाटेचेच संकेत’

Maharashtra Crime News | धक्कादायक ! महिला तहसिलदारावर तहसील कार्यालयात कोयत्याने हल्ला

Gopichand Padalkar On Sharad Pawar | आमदार गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली; शरद पवारांवर खालच्या पातळीवर टीका

 

Related Posts