IMPIMP

Jaya Bhardwaj | ‘या’ भारतीय क्रिकेटरच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी; काय आहे नेमके प्रकरण?

by nagesh
 Jaya Bhardwaj | jaya bhardwaj wife of deepak chahar cheated 10 lakhs rupees by hyderabad cricket association former officer

सरकारसत्ता ऑनलाईन   : Jaya Bhardwaj | क्रीडा विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट संघातील स्टार गोलंदाज दीपक चहरच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दीपक चहरची पत्नी जयाची हैदराबाद क्रिकेट असोसिएशनमधील एका माजी अधिकाऱ्याने फसवणूक केली आहे. सुमारे 10 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. दीपक चहरच्या वडिलांनी संबंधित माजी अधिकाऱ्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. (Jaya Bhardwaj)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय आहे नेमके प्रकरण?

दीपकच्या पत्नीने संबंधित अधिकाऱ्याला एका व्यवहारासाठी पैसे दिले होते. यानंतर जेव्हा तिने या अधिकाऱ्याकडे ते पैसे परत मागितले तेव्हा त्या अधिकाऱ्याने शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी देखील दिली. यानंतर दीपक चहरचे वडील लोकेंद्र चहर यांनी या फसवणुकीविरोधात उत्तर प्रदेशमधील आग्राच्या हरीपर्वत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. (Jaya Bhardwaj)

 

FIR नुसार हैदराबादच्या पारिख स्पोर्ट्स विरोधात हि तक्रार दाखल करण्यात आली आहे.
एका डीलसाठी पारिख स्पोर्टसने जया यांच्याकडून 10 लाख रुपये घेतले होते.
मात्र काही कारणास्तव ती डील होऊ शकली नाही.
यानंतर जयाने जेव्हा त्या डीलचे पैसे परत मागितले तेव्हा पारिख स्पोर्टसने त्यांना ते दिले नाही.
उलट त्यांना शिवीगाळ केली. यामुळे दीपक चहरचे वडील लोकेंद्र चहर यांनी या प्रकरणी पारिख स्पोर्ट्सचे मालक
ध्रुव पारिख आणि कमलेश पारिख यांच्याविरोधात FIR दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-    Jaya Bhardwaj | jaya bhardwaj wife of deepak chahar cheated 10 lakhs rupees by hyderabad cricket association former officer

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Chinchwad Crime | भागिदार आणि कर्मचाऱ्याकडून कंपनीला 3 कोटींचा गंडा, भोसरी एमआयडीसी परिसरातील प्रकार

Pune Crime News | फरासखाना, डेक्कन, शिवाजीनगर, समर्थ, सहकारनगर, भारती विद्यापीठ, दत्तवाडी, वारजे, उत्तमनगर, कोथरुड, सिंहगड, चतु:श्रृंगी, चंदननगर, विमानतळ, येरवडा, विश्रांतवाडी, मुंढवा, लोणी काळभोर, हडपसर परिसरात अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर पुणे पोलिसांचा छापा, 22 जणांना अटक

Satara News | दारू विक्रेत्याला महिलांकडून बेदम मारहाण; साताऱ्यातील चिलेवाडीमधील घटना

 

Related Posts