IMPIMP

Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांना अटक; ट्विटरवरून दिली माहिती

by nagesh
NCP MLA Jitendra Awhad | ncp jitendra awhad tweet on aurangjeb controversy chandrashekhar bawankule bjp

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि माजी मंत्री राहिलेले जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना पोलिसांनी अटक (Arrested) केली आहे. काही दिवसांपूर्वी मॉलमधील मारहाण प्रकरणात जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना पोलिसांनी अटक केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी विवियाना मॉल मधील ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) या सिनेमाचा प्रयोग थांबवण्यासाठी गेले होते. वर्तकनगर पोलीस ठाण्यात (Vartaknagar Police Station) आव्हाड यांची चौकशी होणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी याबाबत ट्विटरवरून (Twitter) माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या पहिल्या ट्विटमध्ये म्हटले, ‘आज दुपारी साधारण 1 वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. निकम (Police Inspector Mr. Nikam) यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या, असे ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. मी म्हटलं की, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो.’

 

 

आव्हाड पुढे लिहितात, ‘मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं.
त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेह-यावरती अस्वस्थपणा दिसत होता.
हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले की, मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत.
तुम्हांला अटक करावी लागेल. हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे.
फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही.’

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Jitendra Awhad | jitendra awad in police custody

 

 

हे देखील वाचा :

Sanjay Raut | ‘शिवसेना आगामी काळात मोठा लढा उभा करेल’ – संजय राऊत

Rajiv Gandhi Case | राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषींची सुटका करा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

Nitin Gadkari | ‘वेगळ्या विदर्भाचा वाद पुन्हा चर्चेत’, आंदोलन समिती मागणार गडकरींसह १० खासदारांचा राजीनामा

 

Related Posts