IMPIMP

Sanjay Raut | ‘शिवसेना आगामी काळात मोठा लढा उभा करेल’ – संजय राऊत

by nagesh
Sanjay Raut 'Shiv Sena will put up a big fight in the future' - Sanjay Raut

सरकारसत्ता ऑनलाईन शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) तब्बल 3 महिन्यानंतर कारागृहातून बाहेर आले आहेत. कथित गोरेगाव पत्राचाळ भूखंड प्रकरणात त्यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) अटक केली होती. त्याप्रकरणी त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली होती. त्यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अनेक पदाधिकारी आणि नेत्यांची भेट घेतली आहे. यावेळी ते प्रसार माध्यामांशी बोलत होते.

 

संजय राऊत यांच्या भांडूप येथील राहत्या घरी विधान परिषद विरोधी पक्षनेता अंबादास दानवे (Ambadas Danave), शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) तसेच आमदार आणि पदाधिकारी त्यांच्या भेटीला आले होते. यावेळी राऊत म्हणाले, घरातील माणसे आहेत. कुटुंबातील माणसे आहेत. तीन महिन्यांनी मी बाहेर आलो त्यामुळे ते मला भेटायला येत आहेत. त्यांना भेटून आनंद होतो. आम्ही चर्चा करत आहोत. आणि त्या होत राहतील. एकमेकांची सुख दु:खे जाणून घेत आहोत. माझ्या भेटींमध्ये माझा जास्त वेळ जात असल्याने माझे वेळेचे गणित थोडे चूकत आहे, असे राऊत (Sanjay Raut) म्हणाले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलण्यास नकार दिला आणि मी आता मातोश्रीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या भेटीला जात आहे, म्हणत निरोप घेतला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

संजय राऊत यांची बुधवारी सुटका करण्यात आली. दोन लाखांच्या जातमुचल्यावर त्यांना जामीनावर सोडण्यात आले आहे.
यावेळी आर्थर रोड कारागृहाबाहेर आणि त्यांच्या निवासस्थानी त्यांचे मोठे स्वागत करण्यात आले होते.
तसेच त्यांना विविध पदाधिकारी आणि मान्यवर भेटण्यासाठी जात आहेत. त्यांनी देखील सर्वांचे आभार मानले आहेत.
व शिवसेना आगामी काळात मोठा लढा उभा करेल, असा विश्वास सर्वांना दिला आहे.

 

Web Title :- Sanjay Raut ‘Shiv Sena will put up a big fight in the future’ – Sanjay Raut

 

हे देखील वाचा :

Rajiv Gandhi Case | राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषींची सुटका करा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

Nitesh Rane | हातात भगवा घेतला म्हणून कोणी हिंदुत्ववादी होत नाही – नितेश राणे

Prasad Oak | ‘गोदावरी’ सिनेमा पाहून भारावून गेलेल्या प्रसाद ओकने चित्रपटाबद्दल लिहिली ‘ही’ खास पोस्ट

 

Related Posts