IMPIMP

Kailash Gorantyal | अब्दुल सत्तार मतिमंद आहेत, त्याला मतिमंदांच्या शाळेत पाठवा – कैलास गोरंट्याल

by nagesh
Kailash Gorantyal | Abdul Sattar is mentally retarded, send him to a mental school

जालना : सरकारसत्ता ऑनलाईन   काँग्रेस (Congress) खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वात निघालेली ‘भारत जोडो‘ यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेस देखील त्यात मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहे. त्यासाठी जालना येथून एक रॅली भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती काँग्रेसचे जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल (Kailash Gorantyal) यांनी दिली आहे. तसेच गोरंट्याल (Kailash Gorantyal) यांनी यावेळी कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांचा देखील समाचार घेतला.

 

राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेत मरावाड्यात असून त्यांच्या या यात्रेला प्रसाद देण्यासाठी जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने येत्या 14 नोव्हेंबर रोजी रॅली काढण्यात येणार आहे. जालना शहरातील संभाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ही रॅली सुरू होणार असून, मोतीबाग, शनीमंदिर, चमन, मस्तगडमार्गे मामा चौकात या रॅलीचा समारोप होणार आहे. मामा चौक येथे एका सभेचे आयोजन केल्याचे देखील गोरंट्याल यांनी सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यावेळी पत्रकारांनी अब्दुल सत्तार यांच्या वादग्रस्त विधानावर गोरंट्याल यांना प्रश्न विचारला.
त्यावर गोरंट्याल म्हणाले, या अब्दुल सत्तारला मतिमंदांच्या शाळेत पाठवा. तो मूर्ख माणूस आहे.
अब्दुल सत्तार हा मूर्ख माणूस असून, तो मोठा झाला, पण त्याची बुध्दी मोठी झाली नाही.
मी म्हणतो ते तुम्ही छापाल तरी चालेल, माझी काहीही हरकत नाही, असेही गोरंट्याल म्हणाले.
भारत जोडो रॅली संपली की मग याच्याकडे आम्ही पाहू. त्याची सत्तेची मस्ती आम्ही उतरवू, असा इशाराही कैलास गोरांट्याल यांनी यावेळी दिला.

 

Web Title :- Kailash Gorantyal | Abdul Sattar is mentally retarded, send him to a mental school

 

हे देखील वाचा :

Uday Samant | जितेंद्र आव्हाडांवर जी कारवाई झाली आहे, ती कायद्यानुसार झालेली आहे – उदय सामंत

Jitendra Awhad | “जामीन पण करणार नाही…”; जितेंद्र आव्हाड कडाडले

Jitendra Awhad | “भावनिक ब्लॅकमेल करण्याची गरज नाही…”; मनसेचा आव्हाडांना सल्ला

 

Related Posts