IMPIMP

भारत पाकिस्तानला देणार ‘कोरोना’ लशीचे डोस; कंगना रणौत म्हणाली- ‘आता तिथंही भाजपचं सरकार’

by bali123
Kangana Ranaut | mumbai congress leaders files complaint against actress kangana ranaut

सरकारसत्ता ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ( kangana ranaut ) आपल्या बिनधास्त वक्तव्यांसाठी ओळखली जाते. सोशलवर ती कायमच अॅक्टिव्ह असते. कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर ती भाष्य करतच असते. अनेकदा ती वादातही सापडली आहे. तिचे ट्विट्स कायमच चर्चेत असतात. भारत पाकिस्तानला कोरोना लस पाठवणार आहे, या वृत्तावरही तिनं मजेदार प्रतिक्रिया दिली आहे. कंगनानं याबाबत ट्विट केलं आहे.

‘तिथेही लवकरच भाजपचं सरकार असेल’
भारत पाकिस्तानला 45 दशलक्ष कोरोना लशीचे डोस पाठवणार असल्याच्या वृत्तावर बोलताना आपल्या ट्विटमध्ये कंगना kangana ranaut म्हणते, म्हणजे मोदी जी म्हणत आहेत की, तेदेखील भारताचाच एक भाग आहे. तिथेही लवकरच भाजपचं सरकार असेल. दहशतवादी माझे नाहीत, परंतु लोकं तर माझेच आहेत. हा… हा… हा… जबरदस्त असं कंगनानं लिहिलं आहे.

कंगना kangana ranaut  चं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी हे ट्विट शेअरदेखील केलं आहे. सध्या सोशल मीडियावर तिच्या ट्विटची खूप चर्चा सुरू आहे.

कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती पंगा सिनेमात दिसली होती. लवकरच ती आगामी सिनेमा थलायवीमध्ये दिसणार आहे.
तामिळनाडूच्या राजकारणातील एक मोठं नाव तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या बायोपिकमध्ये जयललिता यांची भूमिका कंगना साकारणार आहे.
याशिवाय ती तेजस आणि धाकड या सिनेमातही काम करताना दिसणार आहे.

PM मोदींचा फोटो हटवा; निवडणूक आयोगाचा आदेश

रेखा जरे हत्याकांड प्रकरण : ॲड. उमेशचंद्र यादव यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

Related Posts