IMPIMP

PM मोदींचा फोटो हटवा; निवडणूक आयोगाचा आदेश

by bali123
pm narendra-modi

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस या पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांच्याकडून आपल्याकडे असलेल्या मंत्रालयाचा निवडणूक काळात प्रभाव टाकण्यासाठी सरळ सरळ गैरवापर केल्याचा आरोप केला आहे.

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी आदी राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. अवघ्या काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मोदींचा फोटो कोराना कोव्हिड-19 लसीकरणाच्या प्रमाणपत्रावरून हटवण्याचा आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे. आदर्श आचारसंहितेचे पावित्र्य राखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांचे छायाचित्र निवडणुका असणाऱ्या राज्यांमधून काढले जावे, असे आरोग्य मंत्रालयाला निवडणूक आयोगाने सांगितले आहे.

निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोगाने कोरोना लस घेतल्यावर मिळणाऱ्या प्रमाणपत्रावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा हटविण्यास सांगितले आहे.
अशा प्रकारचे फोटो प्रमाणपत्रावर असणे म्हणजे निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचा भंग होतो,
असे निरीक्षण नोंदवत निवडणूक आयोगाने हे आदेश दिले आहेत.

Related Posts