IMPIMP

Kartik Aaryan | कार्तिक आर्यन करतोय ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याच्या बहिणीला डेट; पहा आहे तरी कोण ?

by nagesh
Kartik Aaryan | kartik aaryan dating hrithik roshan cousin pashmina roshan

सरकारसत्ता ऑनलाईन टीम : बॉलीवूडमध्ये हँडसम अभिनेता म्हणून कार्तिक आर्यनची (Kartik Aaryan) ओळख आहे. कार्तिक आर्यन हा त्याच्या
चित्रपटांमुळे चर्चेत तर असतोच. त्याचबरोबर त्याच्या पर्सनल लाईफ मुळे देखील तो चर्चेच्या केंद्रस्थानी कायमच असतो. सध्या कार्तिक आर्यन (Kartik
Aaryan) हा हृतिक रोशन (Hrithik Roshan) ची चुलत बहीण पशमीना रोशन (Pashmina Roshan) हिला डेट करत असल्याचे सांगितले जात आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

कार्तिक आणि पशमीना अनेकदा एकमेकांसोबत दिसून आले. हे दोघेही एकमेकांच्या घरी देखील भेटत असतात. एवढेच नाही तर दिवाळीत कार्तिक आणि पशमीनाला जुहू येथे पाहण्यात आले होते. कार्तिकला जेव्हा काही काम नसतं तेव्हा त्याला पशमीना सोबत वेळ घालवायला आवडतं. यामुळे सध्या कार्तिक (Kartik Aaryan) आणि पशमीना एकमेकांना डेट करत आहेत का? अशी शंका चाहत्यांच्या मनात निर्माण होत आहे. अद्याप तरी या दोघांनीही याबाबतीत कोणताच खुलासा केला नाही.

 

पशमीना रोशन ही फिल्म मेकर राजेश रोशन ची मुलगी आणि सुपरस्टार ऋतिक रोशनची चुलत बहीण आहे. सध्या पशमीना रोशन बॉलीवूडमध्ये (Bollywood) पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली असून ‘इश्क विश्क रिबाऊंड” मध्ये ती दिसणार आहे.

 

‘लव आजकल” (Love Aaj Kal) या चित्रपटाचे चित्रीकरण करताना कार्तिक आणि सैफ अली खानची (Saif ali khan)
मुलगी सारा अली खान (Sara Ali Khan) हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू होत्या.
मात्र चित्रपट संपताच या चर्चेला देखील पूर्णविराम मिळाल्याचे दिसले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Kartik Aaryan | kartik aaryan dating hrithik roshan cousin pashmina roshan

 

हे देखील वाचा :

Bank Interest Rate Hike | HDFC पाठोपाठ ‘या’ बँकेनेही वाढवले व्याजदर, नवे व्याजदर लागू: EMI ही वाढणार

Devendra Fadnavis | ‘अब्दुल सत्तार जे बोलले त्याचं मी समर्थन करणार नाही, ते चुकच आहे, पण…’, अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यावर फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका (व्हिडिओ)

 

Related Posts