IMPIMP

Devendra Fadnavis | ‘अब्दुल सत्तार जे बोलले त्याचं मी समर्थन करणार नाही, ते चुकच आहे, पण…’, अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यावर फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका (व्हिडिओ)

by nagesh
Devendra Fadnavis | dcm devendra fadnavis reacts on abdul sattar controversial statement on supriya sule

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांच्यावर टीका करताना वादग्रस्त विधान केले आहे. त्याचे राज्यभर तीव्र पडसाद उमटत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याचं कुठलंही समर्थन करणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. मात्र दोन्ही बाजूंनी अचारसंहिता पाळणं गरजेचं आहे, असं मतही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केलं.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

कोणीही महिलांबद्दल अपशब्द काढू नयेत, ते अतिशय चुकीचं आहे. ते जसं आमच्याकडच्या नेत्यांना लागू आहे, तसं त्यांच्याकडील नेत्यांनाही लागू आहे. मला त्यामध्ये जायचं नाही. मात्र राजकारणात (Politics) आचारसंहिता (Code of Conduct) पाळली गेली पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

 

 

अब्दुल सत्तार जे बोलले, त्याचं कुठलंही समर्थन मी करणार नाही. ते चूकच आहे, पण त्याच वेळी खोके वगैरे उलट सुलट बोलणंही चूकच आहे, हेही समजून घेतलं पाहिजे. दोन्ही बाजूंनी आचारसंहिता पाळणं गरजेचं आहे. राजकारणाची पातळी अतिशय खाली चालली आहे. महाराष्ट्रात ही पातळी असू नये असं मला वाटतं. जोपर्यंत मोठे नेते आपापल्या नेत्यांना सांगत नाहीत तोपर्यंत हे शक्य होणार नाही, असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

काय म्हणाले अब्दुल सत्तार?

औरंगाबादमध्ये एका मराठी वृत्तवाहीनीच्या प्रतिनिधीशी बोलताना सत्तार यांना सुप्रिया सुळेंबद्दल प्रश्न
विचारण्यात आला. तुम्ही सुप्रिया सुळेंना खोके देण्याची ऑफर केल्यावरुन त्यांनी तुमच्याकडे आले असतील
खोके म्हणून तुम्ही खोके देण्यासाठी तयार झाला आहात, असं म्हटलं आहे.
यावर काय सांगाल असं सत्तार यांना विचारण्यात आले.
या प्रश्नावर सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकरी उल्लेख करत त्यांना शिवी दिली.
‘इतकी भिकारXX झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ’ असं उत्तर सत्तार यांनी दिलं.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Devendra Fadnavis | dcm devendra fadnavis reacts on abdul sattar controversial statement on supriya sule

 

हे देखील वाचा :

Aditya Thackeray | मुख्यमंत्र्यांकडून नव्हे तर फडणवीसांकडून अपेक्षा, ते अब्दुल सत्तारांवर कारवाई करतील- आदित्य ठाकरे

Suryakumar Yadav | ‘सूर्याला तोड नाही; त्याच्यासारखं खेळणं प्रत्येकाला शक्य नाही!’ ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ माजी दिग्गजाचे मोठे वक्तव्य

Cursed Movie | हॉलीवूडचा ‘हा’ चित्रपट आहे शापित ; स्क्रिप्ट तयार असून देखील चित्रपट कधीच बनला नाही

 

Related Posts