IMPIMP

Kedar Dighe | आनंद दिघेंनी अध्यात्मिक क्षेत्राला कधीही राजकीय आखाडा बनवले नाही, केदार दिघेंनी शिंदे गटाला सुनावले

by nagesh
Kedar Dighe | kedar dighe replied to shital mhatre on rashmi thackeray statement

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Kedar Dighe | दिवंगत आनंद दिघे (Anand Dighe) यांनी कधीही अध्यात्मिक क्षेत्राला राजकीय आखाडा बनवला
नाही. आज अनेक जण देवीच्या दर्शनाला येतात. त्यामुळे इथे कोणी आमने-सामने येण्याचा प्रश्नच येत नाही. प्रत्येक जण इथे देवीचरणी असणारी
श्रद्धेसाठी येत असतो. त्याच हेतूने रश्मी ठाकरेही येथे येत आहेत, अशी प्रतिक्रिया केदार दिघे (Kedar Dighe) यांनी दिली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ठाण्यातील टेंभीनाक्यावरील नवरात्रोत्सव (Navratriutasav) यावर्षी जास्त चर्चेत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा प्रभाव असलेल्या या भागात आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे शिवसेनेच्या (Shivsena) वतीने शिंदे गटाचा (Shinde Group) सामना करत असल्याचे चित्र आहे. टेंभीनाक्यावरील देवीचे दर्शन शिवसेना आणि शिंदे गटातील अनेक नेते घेत आहेत.

 

आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांच्या पत्नी येथील देवीच्या दर्शनासाठी येणार असल्याने शिंदे गटामध्ये चलबिचल आहे. यावरून शिंदे गटाकडून टीकादेखील केली जात आहे. याची दखल घेत आणि आनंद दिघे यांचे उदाहरण देत केदार दिघे यांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे. शिवाय, यावेळी दिघे (Kedar Dighe) यांनी शितल म्हात्रेंच्या (Shital Mhatre) टीकेलाही प्रत्युत्तर दिले आहे.

 

ठाण्यातल्या देवीच्या दर्शनाला मुंबईतून महिला आणाव्या लागतात,
अशी टीका शिंदे गटाच्या शितल म्हात्रे यांनी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्या दौर्‍यावरून केली होती.
यावर केदार दिघे म्हणाले की, प्रत्येक ठिकाणी राजकारण करण्याची गरज नाही.
रश्मी ठाकरेंचा दौरा पूर्वनियोजित होता. सामनातून सांगितल्याप्रमाणे रश्मी ठाकरे जर देवीच्या दर्शनाला येत असतील
तर शिवसेनेच्या महिला आघाडीने त्यांच्या हातून आरती करण्याचा प्रस्ताव मांडला होता. यात चूकीचे काहीही नाही.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Kedar Dighe | kedar dighe replied to shital mhatre on rashmi thackeray statement

 

हे देखील वाचा :

Pune PMC News | विद्यार्थ्यांना पायी अथवा सायकलने सुरक्षितरित्या शाळेत जाता यावे यासाठी महापालिकेच्यावतीने आयोजित ‘सेफ स्कूल’ स्पर्धेत सहभागी आठ प्रोजेक्टस्चे आज सादरीकरण

Pune Crime | गुन्हे शाखेकडून मोक्कातील वर्षभरापासून फरार आरोपींना अटक

Chhagan Bhujbal | छगन भुजबळांना ‘पुन्हा’ अंडासेल दाखवण्याची वेळ आली आहे, ‘त्या’ वादग्रस्त विधानावरुन भाजपचा इशारा

 

Related Posts