IMPIMP

Ketaki Chitale On Amruta Fadnavis | अमृता फडणवीसांच्या वक्तव्यावर केतकी चितळेकडून नाव न घेता टीका; म्हणाल्या, ‘देश प्रत्येक…’

by nagesh
Ketaki Chitale On Amruta Fadnavis | ketaki chitale comment on amruta fadanvis related pm narendra modi statement viral

सरकारसत्ता ऑनलाईन – Ketaki Chitale On Amruta Fadnavis | नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी सोशल मिडीयावर ट्रोल होणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळे हिने नुकतीच एक सोशल मिडीया पोस्ट केली आहे. त्यात तिने अमृता फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या एका वक्तव्यावर नाव न घेता टीका केली आहे. केतकी ही नेहमी आपल्या सोशल मिडीया पोस्टच्या माध्यमातून चर्चेत असते. ती नेहमीच सोशल मिडीयावर परखड मत मांडत असते. त्यातच तिने केलेल्या पोस्टमुळे ती पुन्हा एकदा टीकेचे लक्ष्य बनताना दिसत आहे. (Ketaki Chitale On Amruta Fadnavis)

 

काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एका कार्यक्रमात बोलत असताना देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भाष्य केले होते. त्यात त्यांनी आपल्या देशाचे दोन राष्ट्रपिता आहेत. महात्मा गांधी हे जुन्या भारताचे तर पंतप्रधान मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत. हे विधान केले होते. त्यानंतर त्यांचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला. त्यावर नेटकऱ्यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली. या सर्व प्रकरणावर केतकीने एक पोस्ट शेअर करत आपली भूमिका मांडली आहे. (Ketaki Chitale On Amruta Fadnavis)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

केतकी चितळेने नाव न घेता अमृता फडणवीस यांच्यावर निशाना साधला आहे.
केतकीने लिहीले आहे की, ‘जुनं आणि नव यावरून जे काही समोर येत आहे ते जुनेच झाले आहे.
जसं की नवीन राष्ट्रपिता हा वाद आता जुना होतोय. भारत देश हा प्रत्येक सेकंदाला बदलत आहे.
आणि आपण स्वतःलाही बदलायची वेळ आली आहे.
आता ३ हजार वर्षे प्राचीन गोष्टींची व्याख्या करायची झाल्यास शंभर वर्षाची झाली आहे.
आणि हे आपण लक्षात घेण्याची गरज आहे.
तसेच या इन्स्टा स्टोरीच्या शेवटी केतकीने हॅश टॅग करत ‘जागो मेरे देश’ असे लिहीले आहे.

 

Web Title :- Ketaki Chitale On Amruta Fadnavis | ketaki chitale comment on amruta fadanvis related pm narendra modi statement viral

 

हे देखील वाचा :

Sanjay Raut | राहुल शेवाळेंच्या आरोपावर संजय राऊत यांचे प्रत्युत्तर

Deepak Kesarkar | अनुसूचित जमाती प्रवर्गाची भरती प्रक्रिया कालबद्ध पद्धतीने राबविणार, दीपक केसरकर यांची विधानपरिषदेत माहिती

Chandrakant Patil | लोकप्रतिनिधींनी मतदारसंघात कुटुंबप्रमुख म्हणूनच काम करावे- चंद्रकांत पाटील

 

Related Posts