IMPIMP

khadakwasla Dam | खडकवासला धरणाच्या पाण्यात बुडून तरुण-तरुणीचा मृत्यू, मृत्यूचे कारण अस्पष्ट

by nagesh
khadakwasla Dam | pune khadakwasla dam death pune youth dies after drowning in khadakwasla dam

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   khadakwasla Dam | खडकवासला धरणाच्या पाण्यात बुडून तरुण-तरुणीचा मृत्यू (Youth Dies Drowning)
झाला. ही घटना सोनापूर गावच्या हद्दीत घडली आहे. घटनेची माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्यातील (Haveli Police Station) पोलीस अधिकारी
आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढले आहेत. अद्याप मृतांची ओळख पटलेली नाही. या दोघांचा
मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही. (khadakwasla Dam)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका स्थानिक नागरिकाला रस्त्याच्या कडेला दुचाकी दिसली. आजूबाजूला पाहिले असता कोणी दिसले नाही. त्यामुळे त्या व्यक्तीने धरणाच्या पाण्याकडे जाऊन पाहिले असता दोन मृतदेह पाण्यावर तरंताना दिसून आले. त्याने तातडीने ही माहिती हवेली पोलीस ठाण्यात दिली. या स्थानिक व्यक्तीची खाद्यपदार्थाची टपरी असून शनिवार-रविवार सुट्टीच्या दिवशी ते टपरी चालवतात.

 

मृतांची ओळख पटलेली नसली तरी पोलिसांनी गाडीची पाहणी केली असता गाडीच्या नंबरवरुन दोघांपैकी एक जण सिंहगड रस्त्यावरील (Sinhagad Road) वडगाव बुद्रुक येथील असावा अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. परंतु, अद्याप पोलिसांच्या हाती कोणतीच ठोस माहिती लागलेली नाही. तरुणीच्या बॅगेत असलेल्या वहीवर प्रियंका चौगुले (Priyanka Chowgule) असे नाव लिहिलेले आहे.

 

स्थानिक व्यक्तीला रस्त्याने जाताना एक गाडी खडकवासल्याच्या काठावर दिसली.
त्यावेळी त्यांनी आजूबाजूला पाहिले असता या परिसरात कोणी दिसले नाही.
त्यानंतर त्याने पाण्यात बघितल्यावर एक सॅक दिसली.
त्यानंतर पुन्हा निरखून पाहिले असता त्या व्यक्तीला मृतदेह तरंगाताना दिसले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- khadakwasla Dam | pune khadakwasla dam death pune youth dies after drowning in khadakwasla dam

 

हे देखील वाचा :

Anil Deshmukh | देशमुखांचा जेलमधील मुक्काम वाढला, हायकोर्टाने जामीनावरील स्थगिती वाढवली

Chandrakant Patil | ‘आता एकाच वेळी 6 विद्यापीठांची पदवी आपण घेऊ शकतो’; उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची सभागृहात माहिती

Winter Session -2022 | क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक उभारणीबाबतचा अहवाल आठवडाभरात सादर करा, मुख्यमंत्र्यांचे पुणे जिल्हाधिकारी, पालिका आयुक्तांना निर्देश

 

Related Posts