IMPIMP

Chandrakant Patil | ‘आता एकाच वेळी 6 विद्यापीठांची पदवी आपण घेऊ शकतो’; उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची सभागृहात माहिती

by nagesh
Chandrakant Patil | 'Now we can take the degree of 6 universities at the same time'; Information of Higher and Technical Education Minister Chandrakant Patil in the hall

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन   आज हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी नवीन शैक्षणिक धोरणाविषयी माहिती दिली. देशात स्वायत्त महाविद्यालये आणि स्वायत्त विद्यापीठ तयार व्हावेत, हा आग्रह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धरला होता. यापूर्वी एकावेळी एकाच विद्यापीठाची पदवी आपण घेऊ शकत होतो, मात्र आता एकाच वेळी सहा विद्यापीठांची पदवी आपण घेऊ शकतो, अशी माहिती चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सभागृहात दिली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटले कि, महाराष्ट्रामध्ये नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो आग्रह धरला कि, हळूहळू स्वायत्त महाविद्यालय आणि स्वायत्त विद्यापीठ तयार व्हावीत कि ज्यामुळे अभ्यासक्रमातील म्हणजे एकच अभ्यासक्रम वर्षांनुवर्षे शिकवले जातात हा जो भाग आहे त्यामध्ये प्रयोगांना परवानगी देण्यात आली. ज्यामध्ये आता १२ वी नंतर तीन वर्षाची डिग्री आता चार वर्षांची करण्यात आली आहे. ज्यामध्ये मल्टी एंन्ट्री आणि मल्टी एक्सिट ठेवली आहे.

 

यामध्ये दोन वर्ष तुम्ही अभ्यासक्रम थांबवून काही वर्षांच्या गॅप नंतर पुन्हा अभ्यासक्रम जॉईन करू शकता.
दोन वर्षांमध्ये तुम्ही जो कोर्स पूर्ण केला त्याचे क्रेडिट तुमच्या डिजिटल लॉकरमध्ये जमा होतात.
आता जगातल्या सगळ्या विद्यापीठांचा एमओयू पूर्ण होत आला.
ज्याच्या आधारावर आपल्या देशात दोन वर्ष पूर्ण केलेले क्रेडिट घेऊन परदेशातल्या विद्यापीठामध्ये प्रवेश घेऊ शकता.
तुम्ही तिथे पुढचं शिक्षण घेऊ शकता, असे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सांगितले.

 

एका वेळेला आपण एकाच विद्यापीठाची पदवी घेऊ शकत होतो,
आता एका वेळेला तुम्ही सहा सहा विद्यापीठांच्या पदव्या घेऊ शकता.
आता ग्रॅज्युएशन नंतर पण पीएचडी करू शकता अशी शिक्षणामध्ये एका अर्थाने सुकरता आणण्याचा जो प्रयत्न सुरु आहे
त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जवजवळ १४० कॉलेजेसना स्वायत्त महाविद्यालय म्हणून आपण परवानगी दिली आहे,
अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Chandrakant Patil | ‘Now we can take the degree of 6 universities at the same time’; Information of Higher and Technical Education Minister Chandrakant Patil in the hall

 

हे देखील वाचा :

Winter Session -2022 | क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक उभारणीबाबतचा अहवाल आठवडाभरात सादर करा, मुख्यमंत्र्यांचे पुणे जिल्हाधिकारी, पालिका आयुक्तांना निर्देश

Rahul Shewale On Aaditya Thackeray | सुशांत सिंग राजपूत प्रकरणावरून शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंचा आदित्य ठाकरेंवर घणाघात…

Anushka Sharma | अनुष्का शर्माला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका! जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण…

 

Related Posts