IMPIMP

Khed Shivapur Toll Plaza | खेड-शिवापूर टोल नाक्यावर MH12 आणि MH14 वाहनांना टोलमाफी बंद

by nagesh
 Khed Shivapur Toll Plaza | Move Khed Shivapur Toll Plaza beyond Bhor border MP Supriya Sules letter to Union Minister Nitin Gadkari

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनपुणे – सातारा रस्त्यावरील (Pune-Satara Road) खेड – शिवापूर टोल नाक्यावर (Khed Shivapur Toll Plaza) एमएच -12 आणि एमएच – 14 या वाहनांची टोलमाफी (Toll Exemption) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने National Highways Authority Of India (NHAI) बंद केली आहे. पुणे – सातारा रस्त्याच्या रुंदीकरणाची कामे (Road Widening Work) पूर्ण झाल्याने आम्ही ही टोलमाफी बंद करत आहोत. 1 मार्चपासून या वाहनांना खेड – शिवापूर टोलनाक्यावर (Khed Shivapur Toll Plaza) टोल आकारण्यात येत आहे, असे NHAI कडून सांगण्यात आले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पुणे – सातारा रस्त्याच्या रुंदीकरणाची रखडलेली कामे वेळेत पूर्ण करावीत आणि खेड शिवापूर टोलनाका (Khed Shivapur Toll Plaza) पीएमआरडीएच्या (PMRDA) हद्दीबाहेर हलवावा या मागणीसाठी खेड – शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीच्या वतीने तीन वर्षापूर्वी आंदोलन (Agitation) करण्यात आले होते. त्यावेळी या मागण्यांबाबत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Union Transport Minister Nitin Gadkari) याच्यासोबत चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल. तोपर्यंत हवेली (पुणे शहर – पिंपरी चिंचवड), भोर, वेल्हा, मुळशी आणि पुरंदर या पाच तालुक्यातील वाहनांना टोलमाफी दिली जाईल, असे लेखी आश्वासन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून देण्यात आले होते. तेव्हापासून खेड – शिवापूर टोल नाक्यावर या पाच तालुक्यातील वाहनांना टोल माफ करण्यात आला होता. परंतु 1 मार्च पासून खेड – शिवापूर टोल नाक्यावर MH – 12 आणि MH – 14 वाहनांना टोल आकारण्यास सुरुवात झाली आहे.

 

यासंदर्भात टोल रोडच्या अधिकार्‍यांनी सांगितले, रस्त्याची कामे पूर्ण झाली असून वाहतुकीस कुठेही अडथळा होत नाही.
त्यामुळे एमएच – 12 आणि एमएच – 14 वाहनांकडून टोल आकारण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
रस्त्याची कामे पूर्ण झाली असून टोल द्या अशी आम्ही वाहनचालकांना विनंती करत आहोत.
तर टोलनाका पुढे हटविण्याचा निर्णय वरिष्ठपातळीवर घेतला जाईल, याचा टोलमाफीशी काहीही संबंध नाही.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

तर रस्त्याची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे एमएच – 12 आणि एमएच – 14 वाहनांकडून टोल आकारण्यात येत आहे.
तसेच स्थानिक नागरिकांच्या वाहनांसाठी मासिक पास उपलब्ध आहेत,
असे NHAI च्या जनसंपर्क विभागाकडून (Public Relations Department) सांगण्यात आले.

 

Web Title :-  Khed Shivapur Toll Plaza | toll exemption mh12 and mh14 vehicles khed shivapur toll plaza pune news

 

हे देखील वाचा :

Diabetes | केवळ 3 तासात डायबिटीज रूग्णांची ब्लड शुगर कंट्रोल करेल ‘हा’ ज्यूस, एक्सपर्टचा दावा

Income Tax Raid | व्यापाऱ्याच्या घरात सापडलं घबाड! नोटांचे बंडल पाहून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांची उडाली झोप

Multibagger Penny Stock | 35 पैशांच्या ‘या’ शेअरनं केली गुंतवणूकदारांची छप्परफाड कमाई, लाखाचे झाले 10 कोटी

 

Related Posts