IMPIMP

Kidney Cure | उन्हाळ्यात का वाढू लागते किडनी स्टोनची समस्या, जाणून घ्या कसा करावा किडनी बचाव

by nagesh
Kidney Stone | how to remove kidney stone treatment tomato tulsi holy basil juice

सरकारसत्ता ऑनलाइन – Kidney Cure | उन्हाळा खूप त्रासदायक असतो. या ऋतूमध्ये पारा झपाट्याने चढतो, त्यामुळे शरीरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ लागतात. वाढत्या तापमानाचा परिणाम किडनीवरही होतो. उष्णता आणि आर्द्रता किडनीसाठी घातक ठरते. उन्हाळ्याला अनेकदा किडनी स्टोन सीझन (Kidney Stone Season) म्हटले जाते, कारण घामामुळे आपले शरीर झपाट्याने डिहायड्रेट होते. डिहायड्रेशन (Dehydration) हे किडनी स्टोनचे (Kidney Stone) एक सामान्य कारण आहे (Kidney Cure).

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

किडनी (Kidney) हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे जो आपले रक्त शुद्ध करतो. किडनी शरीरातील विषारी पदार्थ (Toxic Substances) काढून टाकते. किडनी इलेक्ट्रोलाइट्सची पातळी (Electrolyte Level) नियंत्रित करते. किडनीद्वारेच शरीरात मीठ, पाणी आणि खनिजे संतुलित राहतात. किडनीमध्ये असलेले लाखो फिल्टर रक्तातील विषारी पदार्थ काढून टाकतात (Kidney Cure).

 

उन्हाळ्यात का वाढते मुतखड्याची समस्या (Why Kidney Stones Problem Increases In Summer)

Summer 80 टक्के किडनीच्या समस्या कॅल्शियममुळे होतात. लघवीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण वाढल्याने किडनी स्टोन होण्याची शक्यता वाढते.
अपुर्‍या पाण्यामुळे लघवी एका जागी साचून किडनीमध्ये स्टोनचे रूप घेते.

 

उन्हाळ्यात घाम जास्त येतो आणि अपुरे पाणी प्यायल्यास किडनी स्टोनची समस्या वाढते. उन्हाळ्यात आपण काय खातो यालाही खूप महत्त्व आहे.
आंबट पदार्थांमुळे किडनी स्टोनची समस्या वाढू शकते, या पदार्थांमध्ये मीठ, प्रोटीन आणि साखर जास्त असते, जे किडनी स्टोनची समस्या वाढवू शकते.
उन्हाळ्यात किडनी स्टोनचा त्रास टाळायचा असेल तर आहारात काही बदल करा.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

किडनी स्टोन टाळण्यासाठी आहारात करा हे बदल (Make These Changes In Diet To Prevent Kidney Stones)

आहारात मिठाचे प्रमाण कमी करा (Reduce The Level Of Salt In Diet). जास्त मीठ खाल्ल्याने लघवीतील कॅल्शियमचे प्रमाण वाढते.

उन्हाळ्यात चहा-कॉफीचे सेवन कमी करा (Reduce Tea-Coffee Intake In Summer). कॅफिनच्या अतिसेवनामुळे शरीरातील डिहायड्रेशनची समस्या वाढू शकते.

जास्त पाणी प्या (Drink Plenty Water). तुम्ही किती पाणी पितात याची काळजी घ्या. जास्त पाणी पिणे किडनी डिटॉक्स करण्यासाठी प्रभावी ठरते.

आहारात द्रव पदार्थांचे जास्त सेवन करा (Consume More Liquid Things In Diet). ताक, लस्सी, ज्यूस, लिंबूपाणी यांचे सेवन केल्याने किडनी निरोगी राहते.

लघवी नियमित तपासा (Check Urine Regularly). तुम्ही किती वेळा लघवी करतात याचा मागोवा घ्या. लघवीचा प्रवाह कसा आहे हे देखील तपासा.

लघवी रोखू नका (Don’t Stop Urinating). मूत्राशय नियमितपणे रिकामे ठेवा. लघवी रोखून ठेवल्याने किडनी स्टोनची समस्या वाढू शकते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Kidney Cure | why do kidney stones form in summers know the reason and cure

 

हे देखील वाचा :

Maharashtra Weather Update | राज्यात वाढला उन्हाचा चटका ! आगामी 2 दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता

Purandar Upsa Irrigation Scheme | पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या पाईपलाईन कामास प्रारंभ

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक घटना ! ‘तुझे मेरे लिए ही लाया हू’ म्हणत 47 वर्षीय सासर्‍याकडून 22 वर्षीय सूनेवर बलात्कार

 

Related Posts