IMPIMP

Purandar Upsa Irrigation Scheme | पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या पाईपलाईन कामास प्रारंभ

by nagesh
Purandar Upsa Irrigation Scheme | Commencement of pipeline work of Purandar Upsa Irrigation Scheme

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Purandar Upsa Irrigation Scheme | बारामती तालुक्यातील मोरगांव येथील पुरंदर उपसा सिंचन योजनेमध्ये (Purandar Upsa Irrigation Scheme) जोगवडी ते खटकळ ओढा, ढोलेमळा, मोरगाव येथील शेतीला पाणी पुरवठा होण्यासाठी पाइपलाइन करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी 8 मार्च रोजी 1.32 कोटी C.S.R फंडातून निधी उपलब्ध करण्यात आला आहे. सिरम इन्स्टिट्यूटचे आदर पूनावाला (Adar Poonawalla) यांच्या सहकार्यातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या निधीला मंजुरी दिली आहे. या योजनेमुळे जिरायत भाग शेतकऱ्यांसाठी मोठा फायदा होणार आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

या योजनेमुळे अंदाजे 450 ते 500 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्याचबरोबर अंदाजे 150 से 200 शेतकरी कुटुंबाचे जीवनमान उंचवणार आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी, ग्रामपंचायत, सिंचन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच व इतर ठिकाणी पत्रव्यवहार व पाठपुरावा इतर बाबींसाठी पुणे महापालिकेचे (Pune Municipal Corporation) उपायुक्त संदीप कदम (Sandeep Kadam) नयांनी समन्वय साधून योजना पूर्ण करणेसाठी विशेष योगदान व सहकार्य केले. कदम हे मोरगांव भूमिपुत्र आहे व आम्हास त्यांचा अभिमान आहे असे मोरगांवचे सरपंच निलेश केदारी (Nilesh Kedari) व ग्रामस्थांनी म्हटलं आहे.

 

 

दरम्यान, संबधित पाईपलाईनच्या कामासाठी मोरगावचे विद्यमान सरपंच, उपसंरपंच,
ग्रामपंचायत सदस्य आणि तरुण शेतकरी कार्यकर्ते यांनी विशेष पुढाकार घेतला आहे.
या योजनेमुळे मोरगांव परिसरातील ढोलेमळा, पाटील बुवाचा मळा, चोपणवस्ती,
तावरेवस्ती, हनुमाननगर सोनारशेत येथील शेतक-यांना फायदा होणार असून
पाईपलाईनचे काम येत्या एक-दोन दिवसांत चालू होणार असुन दिड ते दोन
महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

 

Web Title :- Purandar Upsa Irrigation Scheme | Commencement of pipeline work of Purandar Upsa Irrigation Scheme

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक घटना ! ‘तुझे मेरे लिए ही लाया हू’ म्हणत 47 वर्षीय सासर्‍याकडून 22 वर्षीय सूनेवर बलात्कार

Pune Crime | ग्रामसभेत प्रश्न विचारल्याने माजी सरपंचावर कोयत्याने सपासप वार; मुळशी तालुक्यातील सरपंचासह दोघांना अटक

Pune Crime | ‘मी भाई आहे या कॉलेजचा’ ! गल्ली बोळाबरोबरच आता कॉलेजमध्येही भाईगिरी सुरु; पुण्यातील नामांकित महाविद्यालयात सराईत गुन्हेगाराची दहशत

 

Related Posts