IMPIMP

Kirit Somaiya | विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन सोमय्यांचा खळबळजनक दावा; म्हणाले – ‘पवार आणि ठाकरेंनी राहुल गांधींचं पपलू केलं’

by nagesh
Kirit Somaiya | kirit somaiya slams uddhav thackeray and sharad pawar over assembly speaker election

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Kirit Somaiya | महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान (Maharashtra Winter Session) सत्ताधारी आणि विरोधकांत गदारोळ निर्माण झाला होता. त्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकारमधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. अखेर महाविकास आघाडी सरकारने ही निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. अध्यक्षपदाच्या मुद्यावरून महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) आणि भाजप (BJP) यांच्यातही आरोपांच्या फैरी झडत असल्याचं पाहायला मिळाले. यानंतर आता भाजपचे जेष्ठ नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मोठा दावा केला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

त्यावेळी बोलताना किरीट सोमय्या (Kirit Somaiya) म्हणाले, ‘माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) किंवा काँग्रेसचा कोणताही नेता विधानसभा अध्यक्ष होऊ नये, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची होती. त्यातून त्यांनी काँग्रेसची फसवणूक केली. त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा पपलू केला. असा खळबळजनक दावा सोमय्या यांनी केला आहे.

‘शरद पवार, उद्धव ठाकरेंना काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण किंवा काँग्रेसचा कुणी नेता विधानसभेचा अध्यक्ष बनू नये म्हणून त्यांनी दोघांनी मिळून काँग्रेस नेते राहुल गांधींचं पपलू केला.
महाविकास आघाडीकडे 170 आमदार आहेत, भाजपकडे 105, त्यामुळे गुप्त मतदान झालं असतं तर काय फरक पडलं असतं?
असा सवालही सोमय्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, काँग्रेसचा कोणताही नेता अध्यक्ष होऊ नये म्हणून आवाजी मतदान पद्धतीचे नाटक केलं.
राज्यपालांना बदनाम करण्याचा प्रयत्न आणि काँग्रेसचा अध्यक्ष ठाकरे-पवारांनी होऊ दिला नाही. ही हकीकत असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

Web Title :- Kirit Somaiya | kirit somaiya slams uddhav thackeray and sharad pawar over assembly speaker election

हे देखील वाचा :

MP Vinayak Raut | विनायक राऊतांचा घणाघात; म्हणाले – ‘नारायण राणेंचा नरबळी देण्याचा प्रयत्न फसला’

Ajit Pawar | पहाटेच्या शपथविधीवरुन अजित पवार पुन्हा संतापले; म्हणाले – ‘मला वाटेल तेव्हा मी बोलेन, तो माझा अधिकार’

Anti Corruption Bureau Pune | 85 हजार रुपयांची लाच घेताना खासगी इसम अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात; चाकण पोलिस ठाण्यातील PSI सह दोघांवर गुन्हा

Related Posts