IMPIMP

MP Vinayak Raut | विनायक राऊतांचा घणाघात; म्हणाले – ‘नारायण राणेंचा नरबळी देण्याचा प्रयत्न फसला’

by nagesh
MP Vinayak Raut | shivsena mp vinayak raut take a dig at bjp leader and union minister narayan rane

सिंधुदुर्ग : सरकारसत्ता ऑनलाइन MP Vinayak Raut | सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक (Sindhudurg District Bank Election) आज (गुरूवारी) पार पडत आहे. यातच शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab) हल्लाप्रकरणामुळे राज्यात मोठी घडामोड होताना दिसते. याप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) अडचणीत सापडले आहे. त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी आहे. तर दुसरीकडे जिल्हा बँकेची निवडणूक प्रंचड गाजत असल्याचे दिसते. यातच शिवसेना खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक जिंकण्यासाठी ‘राजकीय नरबळी’ देण्याचा नारायण राणे (Narayan Rane) यांचा प्रयत्न फसला,’ असा घणाघात विनायक राऊत यांनी केला.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

त्यावेळी बोलताना विनायक राऊत म्हणाले, ‘यंदाच्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडी समोर आपला निभाव लागणार नाही, ही गोष्ट नारायण राणे यांना समजली होती. त्यामुळेच नारायण राणे 2014 पूर्वी त्यांची जशी ख्याती होती, तसे वागायला लागले. प्रत्येक निवडणुकीला एक नरबळी द्यायचा, ही नारायण राणे यांची पद्धत होती. यावेळीही संजय परब यांच्यावर हल्ला करुन तसा प्रयत्न झाला.’ असं विनायक राऊत (MP Vinayak Raut) म्हणाले.

दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आज (गुरुवारी) मतदान पार पडत आहे. 19 जागांसाठी 39 उमेदवार मैदानात आहेत.
तर 981 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात शिवसेना आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik),
भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली (Rajan Teli) आणि विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत (Satish Sawant) यांचा समावेश आहे.
यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी पुरस्कृत समृद्धी सहकार पॅनल आणि नारायण राणे यांचे सिद्धिविनायक पॅनल यांच्यात सामना रंगला आहे.
तर, 2008 पासून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर राणे गटाचे वर्चस्व होते.
परंतु, 2 वर्षांपूर्वी सतीश सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने जिल्हा बँकेत सत्तांतर झाले होते.
त्यामुळे आता नारायण राणे (Narayan Rane) यांना काही करुन जिल्हा बँकेवर आपला गड राखायचा आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- MP Vinayak Raut | shivsena mp vinayak raut take a dig at bjp leader and union minister narayan rane

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | पहाटेच्या शपथविधीवरुन अजित पवार पुन्हा संतापले; म्हणाले – ‘मला वाटेल तेव्हा मी बोलेन, तो माझा अधिकार’

Anti Corruption Bureau Pune | 85 हजार रुपयांची लाच घेताना खासगी इसम अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात; चाकण पोलिस ठाण्यातील PSI सह दोघांवर गुन्हा

Wedding Insurance | कोरोनामध्ये लग्न रद्द झाले असेल तर परत मिळतील पैसे, ₹ 7500 मध्ये 10 लाखांपर्यंत विमा कव्हर; जाणून घ्या

 

Related Posts