IMPIMP

Kolhapur ACB Trap | 3 हजारांची लाच घेताना सहाय्यक लेखाधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

by nagesh
Kolhapur ACB Trap | assistant accounts officer in the net while accepting a bribe of rs three thousand

पन्हाळा/कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाइन –  बांधकाम, रस्ते कामाच्या बिलांच्या फाईल तपासून विनात्रुटी पुढे पाठवण्यासाठी कंत्राटदाराकडून (Contractor) तीन हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) सहाय्यक लेखाधिकारी (Assistant Accounts Officer) याला कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Kolhapur ACB Trap) अधिकाऱ्यांनी सापळा रचून रंगेहाथ पकडले. अरुण रघुनाथ मांगलेकर Arun Raghunath Manglekar (वय-55 रा. मनोरमानगर, देवकर पाणंद) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या सहाय्यक लेखाधिकाऱ्याचे नाव आहे. कोल्हापूर एसीबीच्या पथकाने (Kolhapur ACB Trap) ही कारवाई गुरुवारी (दि.6) पन्हाळा पंचायत समितीत (Panhala Panchayat Samiti) केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत कंत्राटदाराने कोल्हापूर एसीबीकडे (Kolhapur ACB Trap) तक्रार केली आहे. तक्रारदार यांनी पन्हाळा तालुक्यातील मौजे आरळे गावातील गटार बांधकाम व मौजे सातवे गावातील रस्ता तयार केला आहे. तक्रारदार यांच्या बिलांच्या फाईलस् (Bill Files) पन्हाळा पंचायत समितीकडे मंजूरीसाठी पाठवल्या होत्या. लेखा कक्षातील सहायक लेखाधिकारी अरुण मांगलेकर यांच्याकडे त्यांची तपासणी होणार होती. या फाईल विनात्रुटी पुढे पाठवण्यासाठी मांगलेकर यांनी तीन हजार रुपये लाच मागितली.

 

तक्रारदार यांनी कोल्हापूर एसीबीकडे तक्रार केल्यानंतर अधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि.4) पंचासमक्ष पडताळणी केली.
त्यावळी अरुण मांगलेकर यांनी तक्रारदार यांच्या बीलाच्या फाईल विनात्रुटी पुढे पाठवण्यासाठी तीन हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज (गुरुवार) पन्हाळा पंचायत समितीमध्ये सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून लाच स्विकारताना मांगलेकर याला रंगेहाथ पकडण्यात आले.

 

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे (ACB Pune Region) पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे
(Pune ACB SP Rajesh Bansode), अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav),
कोल्हापूर एसीबीचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत
(Deputy Superintendent of Police Adinath Budhwan) यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक नितीन कुंभार (Police Inspector Nitin Kumhar), पोलीस उपनिरीक्षक संजीव बंबरगेकर
(PSI Sanjeev Bambergekar) पोलीस अंमलदार शरद पोरे, सुनील घोसाळकर, मयुर देसाई, रुपेश माने
यांच्या पथकाने केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Kolhapur ACB Trap | assistant accounts officer in the net while accepting a bribe of rs three thousand

 

हे देखील वाचा :

Dhanushyaban Symbol | धनुष्यबाण चिन्ह कोणाचं? चिन्ह गोठवलं तर दोन्ही गटांचा ‘प्लॅन बी’ तयार?, दसरा मेळाव्यात दोन्ही गटाकडून पक्ष चिन्हाबाबत संकेत

Pune Crime | Cpoints अ‍ॅपची लिंक पाठवून क्रेडिट कार्ड खात्यातून काढले 2 लाख रुपये, आर्थिक फसवणूक करणाऱ्या दिल्लीतील व्यक्तीवर FIR

Women’s T20 Asia Cup 2022 | महिला आशिया चषकात भारतीय महिला वरचढ, जाणून घ्या बाकीच्या संघाची स्थिती

 

Related Posts