IMPIMP

Nitesh Rane | नितेश राणेंना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी, न्यायालयाचा निर्णय

by nagesh
Nitesh Rane | BJP MLA nitesh rane get judicial custody till february 18 court

सिंधुदुर्ग :  सरकारसत्ता ऑनलाइनसंतोष परब हल्लाप्रकरणी (Santosh Parab Attack Case) भाजप आमदार (BJP MLA) नितेश राणे (Nitesh Rane) यांना न्यायालयानं पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली होती. आज त्यांची पोलीस कोठडी संपली आहे. त्यामुळे त्यांना परत न्यायालयात हजर करण्यात आले आहे. पोलिसांनी नितेश राणे (Nitesh Rane) यांची कोठडी वाढवून देण्याची मागणी केली आहे. पण न्यायालयाने 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) दिली आहे. पोलीस कोठडी संपली असली तरी आता त्यांचा मुक्काम कोठडीतच असणार आहे. आज जामिनासाठी अर्ज (Bail Application) करण्यात येणार आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

संतोष परब हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि त्यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब (Rakesh Parab) यांना एकाच वेळी कणकवली दिवाणी न्यायालयात (Kankavali Civil Court) हजर केले गेले. दोघांचीही आज पोलीस कोठडी संपत असल्याने त्यांना कोर्टात हजर करण्यात आले.

 

आमदार नितेश राणेंना पुण्याला (Pune) नेऊन त्यांची चौकशी करायची आहे, त्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे सरकारी वकिलांनी (Government Prosecutors) म्हटलं. तर नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई (Lawyer Sangram Desai) यांनी यावर युक्तिवाद करत आरोपीला पुण्याला घेऊन जाण्याची आवश्यकता का आहे असा सवाल केला होता. त्यामुळे नितेश राणेंना पोलीस कोठडी देऊ नये असाही युक्तीवाद त्यांनी केला.

आमदार राणेंना गोव्यातील (Goa) त्यांच्या हॉटेलवर घेऊन चौकशी केली असता त्यांचा सीडीआर रिपोर्ट (CDR Report) आणि नितेश राणे,
राकेश परब यांचं तिथे झालेल्या संभाषणाची चौकशी पोलिसांनी केली. त्यातून त्यांना काही माहिती मिळाली आहे,
मात्र अजून चौकशीसाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले.
या गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे त्यामुळे आरोपीची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचंही ते म्हणाले.
दोन दिवसांत आरोपीकडून मोबाईल आणि सिम कर्ड जप्त केले,
अजून तपास बाकी असून पोलीस कोठडी आवश्यक असल्याचा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Nitesh Rane | BJP MLA nitesh rane get judicial custody till february 18 court

 

हे देखील वाचा :

Police Inspector Missing | पदोन्नती मिळाली त्याच दिवसापासून ACB चे पोलीस निरीक्षक (PI) बेपत्ता, पोलीस दलात प्रचंड खळबळ

Anil Deshmukh-Anil Parab | पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्यांसाठी अनिल देशमुख आणि अनिल परब यांच्यात गुप्त बैठका?

IPL 2022 | आयपीएलच्या मॅचेस मुंबई-पुण्यात होणार का? सौरव गांगुली म्हणाला…

Anti Corruption Bureau (ACB) Pune | पुणे ग्रामीण पोलिस दलातील कर्मचारी 3 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

 

Related Posts