IMPIMP

Police Inspector Missing | पदोन्नती मिळाली त्याच दिवसापासून ACB चे पोलीस निरीक्षक (PI) बेपत्ता, पोलीस दलात प्रचंड खळबळ

by nagesh
Anti Corruption Bureau (ACB) Pune | Inspector of Police, Assistant Sub-Inspector and private persons involved in a bribery case of Rs 2 lakh in Pune; Both arrested while PI absconding, huge uproar

जालना : सरकारसत्ता ऑनलाइन Police Inspector Missing | जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (Anti Corruption Bureau (ACB) Jalna) पोलीस निरीक्षक संग्राम ताटे Police Inspector Sangram Tate (रा. यशवंत नगर, जालना) हे बुधवारी (दि.2) रात्रीपासून बेपत्ता (Police Inspector Missing) झाले आहेत. मित्राला भेटण्यास जात असल्याचे सांगून ते रात्री घराबाहेर पडले होते. त्यानंतर त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. महत्त्वाचे म्हणजे ताटे यांनी घराबाहेर पडताना मोबाईल, गाडी असे काहीही नेले नाही. जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून संग्राम ताटे यांचा शोध घेतला जात आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

जालना येथील लाचलुपचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक संग्राम ताटे हे बुधवारी रात्री सातच्या सुमारास राहत्या घरातून मित्राला भेटण्यासाठी (Meet Friend) जात असल्याचे पत्नीला सांगून घराबाहेर पडले. बाहेर जाताना त्यांनी गाडी, मोबाईल फोन, खिशातील वॉच पाकीट सोबत नेले नाही. याची माहिती मिळताच औरंगाबाद एसीबी (Aurangabad ACB) विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल खाडे (SP Rahul Khade) हे जालना शहरात ठाण मांडून होते. (Police Inspector Missing)

एसीबी कर्मचाऱ्यांकडून ताटे यांचा शोध सुरु आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील आणि शहरातील सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) तपासले. ताटे यांच्याशी दोन दिवसांपासून संपर्क न झाल्याने त्यांच्या पत्नीने कदीम जालना पोलीस ठाण्यात (Kadim Jalna Police Station) गुरुवारी उशिरा रात्री मिसिंगची तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. ताटे यांना बुधवारीच पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती मिळाली होती. त्यांची कोकण विभागात (Konkan Division) पदोन्नतीवर (Promotion) बदली (Transfer) झाली होती.

 

Web Title :- Police Inspector Missing | acb police inspector Sangram Tate suddenly disappears from jalna for two days

 

हे देखील वाचा :

Anil Deshmukh-Anil Parab | पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्यांसाठी अनिल देशमुख आणि अनिल परब यांच्यात गुप्त बैठका?

IPL 2022 | आयपीएलच्या मॅचेस मुंबई-पुण्यात होणार का? सौरव गांगुली म्हणाला…

Anti Corruption Bureau (ACB) Pune | पुणे ग्रामीण पोलिस दलातील कर्मचारी 3 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Dr. Sumit Saha | समाजामध्ये कर्करोगाची जागरूकता होणे काळाजी गरज – डॉ. सुमित शहा

 

Related Posts