Lok Sabha Election 2024 | राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज ! दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 183 उमेदवारांचे 229 अर्ज दाखल
मुंबई : Lok Sabha Election 2024 | राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल २०२४ रोजी होणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. आज सायंकाळ पर्यंत २२९अर्ज दाखल झाले आहेत.
पहिल्या टप्प्यातील एकूण ५ लोकसभा मतदारसंघात १९ एप्रिल २०२४ रोजी मतदान होणार असून यामध्ये रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली- चिमूर आणि चंद्रपूरचा समावेश आहे.
आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत रामटेक ५१, नागपूर ६२, भंडारा- गोंदिया ४९, गडचिरोली- चिमूर १९ आणि चंद्रपूर ४८ असे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
Pune Hadapsar News | पुणे: हडपसर येथे राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक संपन्न
Comments are closed.