IMPIMP

LPG Gas Connection Price Hike | महागाईचा दणका ! LPG घरगुती गॅस कनेक्शन घेण्यासाठी आता मोजावे लागतील जास्त पैसे, रेग्युलेटर सुद्धा महागला

by nagesh
LPG Cylinder Price Hiked | domestic lpg cylinder price crosses rs 1053 mark with rs 50 hike

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाLPG Gas Connection Price Hike | किचनमध्ये वापरल्या जाणार्‍या वस्तूंच्या किमती गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वाढल्या आहेत. आता नवीन एलपीजी गॅस कनेक्शन (LPG Gas Connection) घेणे महाग झाले आहे (LPG Gas Connection Price Hike). पेट्रोलियम कंपन्या उद्यापासून म्हणजेच 16 जूनपासून वाढलेल्या किमती लागू करणार आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मनीकंट्रोल डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, कंपन्यांनी 14.2 किलोच्या सिलेंडरची सिक्युरिटी अमाऊंट 750 रुपयांनी वाढवली आहे. आता पाच किलोच्या सिलिंडरसाठी 350 रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. सिलिंडरसह पुरवल्या जाणार्‍या गॅस रेग्युलेटरच्या किमतीतही 100 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनी दुसरा सिलिंडर घेतला तर त्यांना वाढीव रक्कम भरावी लागेल.

 

किंमत किती वाढली

आता नवीन स्वयंपाकाचे कनेक्शन घेण्यासाठी ग्राहकाला 2,200 रुपये मोजावे लागणार आहेत.
यापूर्वी ही रक्कम 1450 रुपये होती. अशाप्रकारे आता सिलिंडरची सिक्युरिटी म्हणून 750 रुपये जास्त जमा करावे लागणार आहेत.
याशिवाय रेग्युलेटरसाठी 250, पासबुकसाठी 25 आणि पाईपसाठी 150 रुपये वेगळे द्यावे लागतील. (LPG Gas Connection Price Hike)

त्यानुसार, पहिल्यांदा गॅस सिलिंडर कनेक्शन आणि पहिल्या सिलिंडरसाठी ग्राहकांना एकूण 3,690 रुपये खर्च करावे लागणार आहेत.
जर कोणी दोन सिलिंडर घेतले तर त्याला सिक्युरिटी म्हणून 4400 रुपये द्यावे लागतील.

इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमच्या म्हणण्यानुसार, आता पाच किलोच्या सिलिंडरसाठी 800 रुपयांऐवजी 1150 रुपये द्यावे लागतील. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत एलपीजी सिलिंडर घेणार्‍या ग्राहकांनाही धक्का बसणार आहे.

जर या ग्राहकांनी त्यांच्या कनेक्शनवर सिलिंडर डबल केला म्हणजे दुसरा सिलिंडर घेतला, तर त्यांना वाढीव सिक्युरिटी अमाऊंट भरावी लागेल. नवीन कनेक्शन रेग्युलेटरसाठी ग्राहकांना आता 150 रुपयांऐवजी 250 रुपये खर्च करावे लागतील.

 

जनता आधीच आहे महागाईने त्रस्त

कोविड-19 महामारीनंतर महागाई खूप वाढली आहे. घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या दरातही मोठी वाढ झाली आहे.
याशिवाय खाद्यपदार्थ आणि भाजीपाल्याचे दर प्रचंड वाढल्याने नागरिकांना घर चालवणे कठीण झाले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- LPG Gas Connection Price Hike | lpg gas price hiked lpg gas connection price hiked now have to pay rs 750 more

 

हे देखील वाचा :

Gold Price Today | सोन्याच्या दरात वाढ ! चांदी विकली जात आहे 60 हजाराच्या खाली, किती आहे 10 ग्रॅम सोन्याचा भाव ?

LIC चा नवीन Dhan Sanchay सेव्हिंग प्लान लाँच, जाणून घ्या त्याची सविस्तर माहिती

Reliance Jio Tariff Hike | Jio ने दिला मोठा धक्का ! 899 रुपयांचा झाला 11 महिने चालणारा ‘हा’ प्लान

 

Related Posts