IMPIMP

Mahadev Jankar | …तर खा. सुप्रिया सुळेंचा पराभव अटळ; महादेव जानकरांची भाजपाच्या ‘मिशन बारामती’ ला साथ ?

by nagesh
Mahadev Jankar so the defeat of supriya sule is inevitable mahadev jankars support for bjps mission baramati

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Mahadev Jankar | भाजपाने (BJP) आता पवारांच्या बारामतीवर (Baramati) लक्ष केंद्रित केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर भाजपाने आपल्या हालचाली सुरू केल्या असून महाराष्ट्रातून 45 जागा जिंकण्याचे भाजपाचे मनसुबे आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman) बारामतीच्या दौर्‍यावर असल्याने राजकीय वर्तुळात विविध प्रकारची चर्चा सुरू आहे. आता महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनीही 2024 च्या निवडणुकीत पवारांचा पराभव करण्यासाठी भाजपाला सल्ला दिला आहे. जर योग्य प्लॅनिंग केले तर राष्ट्रवादीचा (NCP) पराभव अटळ आहे, असे जानकरांनी म्हटले आहे.

 

बारामतीमधील समस्या सांगताना जानकर (Mahadev Jankar) यांनी म्हटले आहे की, भौगोलिकदृष्ट्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या एकाबाजूला धरण आणि दुसर्‍याबाजूला पाण्याची टंचाई अशी अवस्था आहे. इंदापुर (Indapur) तालुक्यातील 32 आणि बारामतीतील 26 गावांच्या पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे. मुळशी, दौंडमध्ये सुद्धा ही समस्या आहे.

 

जानकरांनी पुढे म्हटले की, निर्मला सीतारामन बारामतीत लक्ष देत असल्याने त्यांचे अभिनंदन. बारामतीच्या जनतेने मला पावणे पाच लाख मतदान केले होते. भाजपा हा मोठा पक्ष आहे. त्यांना सल्ला देण्याइतपत मी मोठा नाही. पण भाजपाने रासपला हा मतदारसंघ द्यायला हवा होता.

भाजपाला सल्ला देताना जानकरांनी (Mahadev Jankar) म्हटले की, 2019 मध्ये भाजपाच्या उमेदवाराला माझ्याएवढे मतदान झाले नव्हते.
उमेदवारांच्या दृष्टीने भाजपाने एकाच व्यक्तीवर फोकस ठेवला पाहिजे.
शरद पवार (Sharad Pawar) हे देशाचे नेते आहेत. पण बारामतीत वस्तूस्थिती तशी नाही.
बारामती लोकसभा मतदारसंघातील 75 टक्के भाग विकासापासून वंचित आहे.
खडकवासला (Khadakwasla) शहरी भाग असून विकास नाही. पुरंदरची (Purandar) अवस्था आजही वाईट आहे.
जर व्यवस्थित प्लॅनिंग केले तर बारामतीत लोकसभेतही परिवर्तन घडू शकते, असा विश्वास जानकर यांनी व्यक्त केला.

 

त्यांनी भाजपाकडे जागेची अपेक्षा करताना म्हटले की, माजी पंतप्रधान इंदिरा गांधीही (Indira Gandhi) पराभूत होतात त्यामुळे बारामतीत अशक्य काही नाही.
शरद पवारांच्या दबावाला कुठल्याही राजकीय पक्षाने बळी पडू नये.
भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी बारामतीबाबत कुठलीही चर्चा झालेली नाही. 2019 मध्ये ती जागा मागितली होती परंतु दिली नाही.
भाजपाने रासपला जागा दिली तर ती जागा लढवण्यास तयार आहोत.

 

Web Title : – Mahadev Jankar | so the defeat of supriya sule is inevitable mahadev jankars support for bjps mission baramati

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

हे देखील वाचा :

 

 

Related Posts