IMPIMP

Maharashtra Band | पुण्यात ‘सरकारी’ बंदला मध्य वस्तीत ‘उर्त्स्फुत’ प्रतिसाद ! उपनगरांमध्ये सर्व व्यवहार सुरळीत, पीएमपी बसगाड्या, रिक्षा बंद

by nagesh
Maharashtra Band | ‘Government’ bandh in Pune ‘Urtsfut’ response in the central area! All transactions in the suburbs are smooth, PMP buses, rickshaws closed

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन लखीमपूर येथील हिंसाचाराच्या (lakhimpur kheri violence) विरोधात महाविकास आघाडी सरकारने (maha vikas aghadi government) आयोजित केलेल्या महाराष्ट्र बंदला (Maharashtra Band) पुणे शहराच्या (Pune) मध्य वस्तीत कडकडीत प्रतिसाद मिळालेला दिसत असला तरी उपनगरामध्ये मात्र सर्व व्यवहार सकाळी तरी सुरळीत सुरु असल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना (Shivsena), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) या बंदला पाठिंबा दिला आहे. तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते प्रामुख्याने सकाळपासून रस्त्यावर उतरलेले दिसून येत आहे. ज्या ठिकाणी दुकाने उघडी दिसतात, त्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन करताना दिसून (Maharashtra Band) येत आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

गुलटेकडी मार्केटयार्ड (gultekdi, market yard) बंद ठेवण्याचा निर्णय हमाल, मापाडी, टेम्पो चालक संघटनांनी घेतला आहे. त्यामुळे आज मार्केटयार्डमध्ये कोणतीही आवक झालेली नाही. पीएमपीएमएल (PMPML) व्यवस्थापनाने दुपारी १२ पर्यंत बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर रिक्षा पंचायतीसह आपने या बंदला पाठिंबा दिल्याने पीएमपी बस, रिक्षा या रस्त्यावर दिसून येत नाही. तसेच लक्ष्मी रोडवरील दुकाने ही सोमवारी बंद असतात. सणाच्या कालावधीत ती सुरु ठेवण्यात येत असली तरी व्यापारी महासंघाचे दुपारी ३ वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवणार असल्याचे जाहीर केल्याने मध्य वस्तीतील जवळपास सर्व दुकाने बंद (Maharashtra Band) असल्याचे दिसून येत आहे.

 

एस टी बसस्थानकांवर किरकोळ गर्दी दिसून येते़ येणार्‍या एस टी बसगाड्यांमध्ये अतिशय तुरळक प्रवासी दिसून येतात. महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस दलाने ५ हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

 

Web Title : Maharashtra Band | ‘Government’ bandh in Pune ‘Urtsfut’ response in the central area! All transactions in the suburbs are smooth, PMP buses, rickshaws closed

 

हे देखील वाचा :

Maharashtra Band | राज्यात महाराष्ट्र बंदला उर्त्स्फुत प्रतिसाद !

Sangli News | दुर्देवी ! पाझर तलावात बुडून सख्ख्या बहिण-भावाचा मृत्यू

TAMA Electric Car | 1947 मध्येच बनवण्यात आली होती टेस्लाच्या तोडीची इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या 130 वर्षांचा जुना इतिहास

Maharashtra Band | पुण्यात शासकीय यंत्रणेचा गैरवापरकरून बंद करण्याचा प्रयत्न – भाजप शहराध्यक्ष मुळीक

Aadhaar कार्डच्या फ्रॉडपासून वाचायचे असेल तर लवकर अपडेट करा ‘हा’ नंबर, UIDAI ने सांगितली संपूर्ण प्रक्रिया; जाणून घ्या

 

Related Posts