IMPIMP

Aadhaar कार्डच्या फ्रॉडपासून वाचायचे असेल तर लवकर अपडेट करा ‘हा’ नंबर, UIDAI ने सांगितली संपूर्ण प्रक्रिया; जाणून घ्या

by nagesh
Aadhaar | updated mobile no on aadhaar to safe from aadhaar card fraud know how to upadte mobile number with aadhaar to avoid scam

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Aadhaar | युनीक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने आधार कार्ड धारकांना म्हटले आहे की आपला मोबाइल नंबर आधारमध्ये (Aadhaar) नेहमी अपडेट ठेवा आणि फ्रॉडपासून बचाव करा. जर मोबाइल नंबर अपडेट नसेल तर आधारद्वारे होणार्‍या फ्रॉडची माहिती मिळणार नाही आणि याची तक्रार सुद्धा पुढे करता येणार नाही.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

तुमची आधारमधील माहिती अपडेट आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मोबाइल नंबर आणि ईमेल व्हेरिफाय करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप फॉलो करा…

 

1. यासाठी सर्वप्रथम uidai.gov.in वर लॉग ऑन करा.

2. UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर My Aadhaar सेक्शनवर जा.

3. येथे Aadhaar Servicesच्या अंतर्गत Verify Email/ Mobile Number चा ऑपशन दिसेल.

4. आता Verify Email/ Mobile Number ऑपशनला क्लिक करा.

5. येथे आधार No सोबत मोबाइल नंबर किंवा ईमेल आयडी टाका. यानंतर कॅप्चा कोड टाका आणि Send OTP वर क्लिक करा.

6. जर तुम्ही दिलेला मोबाइल नंबर योग्य असेल तर ही प्रोसेस पुढे जाईल, अन्यथा तुम्हाला एक मॅसेज येईल, दिलेली माहिती डेटाबेसशी मॅच होत नाही.

7. अशाप्रकारे आपले सर्व जूने नंबर किंवा सध्याचे नंबर घेऊन ही माहिती मिळवू शकता. कोणता नंबर डाटाबेसशी जुळतो ते समजेल.

आधारमध्ये (Aadhaar) आपला मोबाइल नंबर रजिस्टर करण्यासाठी या स्टेप फॉलो करा –

सर्वप्रथम आधार एनरॉलमेंट/अपडेट सेंटरवर जावे लागेल.

यानंतर आधार कार्ड सुधारणा फॉर्म भरावा लागेल.

जो मोबाइल नंबर अपडेट करायचा आहे तो या फॉर्ममध्ये भरा आणि फॉर्म जमा करा. * नंतर पडताळणीसाठी बायोमेट्रिक्स द्यावे लागेल.

यानंतर तुम्हाला एक रिसिट दिली जाईल.

याच रिसिटमध्ये एक रिक्वेस्ट नंबर मिळेल.

यूआरएन वापरून अपडेशन स्टेटस चेक करू शकता.

आधारमध्ये (Aadhaar) मोबाइल नंबर अपडेट केल्यानंतर तुम्हाला नवीन आधार कार्ड घेण्याची सुद्धा आवश्यकता नाही.

जेव्हा नवीन नंबर आधारसोबत रजिस्टर होईल तेव्हा आधारच्या त्याच बदललेल्या नव्या नंबरवर ओटीपी रिसिव्ह होऊ लागतील.

जर तुम्हाला आधारचे अपडेट स्टेटस पहायचे असेल तर युआयडीएआयच्या टोल-फ्री नंबर 1947 वर कॉल करून जाणून घेवू शकता.

 

Web Title :- Aadhaar | updated mobile no on aadhaar to safe from aadhaar card fraud know how to upadte mobile number with aadhaar to avoid scam

 

हे देखील वाचा :

Gold Price Update | 9320 रुपयांपर्यंत कमी झाला सोन्याचा दर ! 27483 रुपयात मिळतंय 1 तोळा, ‘इथं’ जाणून घ्या 14 ते 24 कॅरेट सोन्याचा नवीन दर

Pune Crime | पुण्यातील गणेश पेठ पोलीस चौकीसमोर एकाच्या डोक्यात फरशी घालून खून

High Court | हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय ! ‘दलित व्यक्तीने क्रॉस घातल्यास किंवा चर्चमध्ये गेल्यास जात प्रमाणपत्र…’

 

Related Posts