IMPIMP

Maharashtra Covid Vaccination | महाराष्ट्राने केला विक्रम; 3 कोटी लोकांचे पूर्ण लसीकरण करणारे देशातील पहिले राज्य

by nagesh
Corona Vaccine Booster Dose | corona vaccine booster dose today seniors frontline workers will get booster dose india Omicron Covid Variant

नवी दिल्ली : वृत्तसंस्था– Maharashtra Covid Vaccination | तीन कोटीपेक्षा जास्त लोकांना कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून बचाव करणारी लस पूर्णपणे देणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य बनले आहे. महाराष्ट्राच्या सीएमओकडून याबाबत माहिती देण्यात आली. तीन कोटीपेक्षा जास्त लोकसंख्येला दोन्ही डोस देण्याच्या विक्रमी आकड्यापर्यंत पोहचणे राज्याच्या आरोग्य यंत्रणेसाठी खुप मोठे यश आहे. सीएमओकडून सांगण्यात आले की, संपूर्ण लसीकरणाचे राज्य बनवण्यासाठी सुद्धा प्रयत्नशील (Maharashtra Covid Vaccination) आहोत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

तर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी माहिती देताना सांगितले की,
कोविड-19 प्रतिबंधक लसीचे 51 लाख डोस देण्यासह देशात आतापर्यंत 103 कोटीपेक्षा जास्त डोस दिले गेले आहेत.
आरोग्य मंत्रालयाने म्हटले की, रात्री उशीरापर्यंत अंतिम अहवाल प्राप्त होईपर्यंत लसीकरणाची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या आकड्यानुसार, लसीकरण अभियानाच्या तिसर्‍या टप्प्याला सुरूवात झाल्यानंतर 18-44 वर्ष वयोगटाला 41,10,37,440 पहिला डोस आणि 13,11,13,078 दुसरा डोस देण्यात आला.
मंत्रालयाने म्हटले की, आतापर्यंत एकुण 72,13,19,294 जणांना पहिला डोस आणि 31,35,17,300 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. कोविड-19 लसीकरणाचा आकडा मंगळवारी 103 कोटीच्या पुढे गेला. (Maharashtra Covid Vaccination)

 

Web Title: Maharashtra Covid Vaccination |corona vaccine india latest news maharashtra crossed the milestone of 3 cr fully vaccinated citizens highest for any state in the country

 

हे देखील वाचा :

Mula Mutha Riverfront Development | मुळा-मुठा नदीकाठ सुधार योजना ! संगमवाडी ते बंडगार्डन या पहिल्या टप्प्यातील कामाची 360 कोटीची निविदा प्रसिद्ध

Robbery On Konark Express | कोणार्क एक्सप्रेसवर दरोडा ! चोरट्यांनी सिग्नल कट करुन 2 महिलांचे दागिने लुटले, हल्ल्यात तरुण जखमी

WhatsApp Payment साठी ‘हे’ काम करणे आवश्यक; होणार मोठा बदल, जाणून घ्या

 

Related Posts