IMPIMP

Maharashtra Election | काँग्रेसनंतर राष्ट्रवादीने केली बंडखोर उमेदवारावर निलंबनाची कारवाई, नागपूर शिक्षक मतदारसंघात 22 उमेदवार रिंगणात

by nagesh
Maharashtra Election | ncp suspended rebel candidate suspended rebel candidate satish itkelwar nagpur election

नागपूर :  सरकारसत्ता ऑनलाईन   Maharashtra Election | राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील निवडणुकीच्या (Teacher-Graduate Legislative Council Election) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा अखेरचा दिवस होता. नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोकण आणि अमरावती येथील निवडणुकीचं चित्र स्पष्ट झाले आहे. नाशिकमध्ये काँग्रेसचे उमेदवार सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांनी एबी फॉर्म असतानाही अर्ज भरला नाही. त्यामुळे काँग्रेसने (Congress) पक्ष विरोधात काम केल्याचा ठपका ठेवत सुधीर तांबे यांना निलंबित केले आहे. तर नागपूर शिक्षक मतदार संघ निवडणुकीत राष्ट्रवादीचे (NCP) उमेदवार सतीश इटकेलवार (Satish Itkelwar) यांचे पक्षातून निलंबन (Suspension) केले आहे. नागपूर शहराध्यक्ष दूनेश्वर पेठे (Duneshwar Pethe) यांनी ही माहिती दिली. (Maharashtra Election)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पक्षाचे आदेश न मानल्याने कारवाई

राष्ट्रवादीने आपले अपक्ष उमेदवार सतीश इटकेलवार यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. इटकेलवार यांनी नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीत (Maharashtra Election) अर्ज दाखल केला होता. आज अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता. पक्षाने सांगूनही त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. इटकेलवार हे सकाळपासून नॉट रिचेबल होते. त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष दूनेश्वर पेठे यांनी सांगितले.

 

 

 

नागपूर शिक्षक मतदारसंघ

नागपूर शिक्षक मतदारसंघातही (Nagpur Teachers Constituency) नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. शिवसेना ठाकरे गटाने गंगाधर नाकाडे (angadhar Nakade) यांना मैदानात उतरवले होते. परंतु त्यांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपचे विद्यमान आमदार नागो गाणार (BJP MLA Nago Ganar) आणि काँग्रेसच्या सुधाकर आडबोले यांच्यात थेट लढत होणार आहे. परंतु राष्ट्रवादीचे सतीश इटकेलवार यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नसल्याने पक्षाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात एकूण 27 अर्ज आले होते. त्यापैकी पाच उमेदवारांनी आज अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता 22 उमेदवार रिंगणात आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Maharashtra Election | ncp suspended rebel candidate suspended rebel candidate satish itkelwar nagpur election

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | खाणीत पडून 21 वर्षीय तरुणीच्या मृत्यू प्रकरणातील आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

Nashik Graduate Constituency | तांबे पिता-पुत्रांच्या बंडखोडीनंतर ‘महाविकास’च्या नाशिक पदवीधर मतदार संघातील अधिकृत उमेदवाराचं नाव जाहीर

Pune Crime News | बीट मार्शलवर सपासप वार करुन फरार झालेल्या आरोपीला बंडगार्डन पोलिसांक़डून अटक

 

Related Posts