IMPIMP

Maharashtra Government Recruitment | राज्यातील नोकरभरती होणार 15 ऑगस्टपूर्वी पूर्ण?; शासकीय यंत्रणा लागली कामाला

by nagesh
 Government Job Recruitment | state govt cancel the recruitment in animal husbandry department

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाईन – राज्यातील ७५ हजार पदांची नोकरभरती ही १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्यासाठी शासकीय यंत्रणा कामाला लागल्याची माहिती आहे. (Maharashtra Government Recruitment) तसेच ज्या जिल्ह्यांमध्ये आयबीपीएस वा टीसीएस या कंपन्यांचे सेंटर नसतील त्या ठिकाणी पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंगच्या कॉलेजची मदत घेतली जाणार आहे. (Maharashtra Government Recruitment) यासाठी समिती गठीत करण्यासंबंधीचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर ही परिक्षा सुरळीत पार पडावी यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली जाणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

देशाच्या स्वातंत्र्याला या वर्षी ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विद्यमान सरकारने ७५००० पदांची नोकरभरती करण्यात येणार आहे. असे जाहीर केले होते. मात्र एवढी मोठी नोकर भरती करताना अनेक अडथळे येऊ शकतात. ते अडथळे दूर करण्यासाठी आणि पारदर्शक पध्दतीने ही नोकरभरती राबविण्यासाठी राज्य सरकार मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करणार आहे. (Maharashtra Government Recruitment) ऑनलाईन पद्धतीने पहिल्यांदाच एवढी मोठीभरती होत असल्याने संबंधित कंपन्यांकडे सेंटर कमी पडत असल्याने नोकरभरती कशी राबवायची यावर मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा झाली आहे. त्यानंतर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

जर राज्यात ऑनलाईन परीक्षा घ्यायच्या असेल तर टीसीएसचे 7500 ते 8000 पर्यंत परिक्षार्थी क्षमता असलेले सेंटर आहेत. तर आयबीपीएसचे 10000 ते 15000 पर्यंत परिक्षार्थी क्षमता असलेले सेंटर आहेत. केवळ एवढेच विद्यार्थी एका वेळी परिक्षा देऊ शकतात. लाखांच्या संख्येने जर उमेदवार आले तर नेमकी परीक्षा प्रक्रिया कशी राबवायची हा सगळ्यात मोठा प्रश्न संबंधित कंपन्या आणि राज्य सरकारच्या पुढे आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठित केली आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी या कंपन्यांची सेंटर नाहीत त्या ठिकाणी खाजगी मदत घेतली जाणार आहे. ज्या ठिकाणी इंजीनियरिंग कॉलेज असेल किंवा इतर ठिकाणी उपलब्ध असलेले कॉम्प्युटर यांच्या माध्यमातून ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राज्यात पहिल्यांदाच सर्वात मोठ्या 75 हजार जागांसाठी ही नोकर भरती होणार आहे.
त्यामुळे मागच्या काही परीक्षांमध्ये झालेला घोटाळा लक्षात घेता ही परीक्षा सुरळीतपणे आणि पारदर्शकपणे पार
पाडण्यासाठी संबंधित कंपन्या आणि राज्य सरकार हे अडथळे दूर करुन हे मिशन कसे यशस्वी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

 

जाणून घ्या कोणत्या विभागामध्ये आहेत अंदाजे किती पदे रिक्त:

आरोग्य खाते – १० हजार ५६८

गृह खाते – ११ हजार ४४३

ग्रामविकास खाते – ११,०००

कृषी खाते – २५००

सार्वजनिक बांधकाम खाते – ८,३३७

नगरविकास खाते – १५००

जलसंपदा खाते – ८२२७

जलसंधारण खाते – २,४२३

पशुसंवर्धन खाते – १,०४७

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Maharashtra Government Recruitment | recruitment of 75 thousand posts in the state will be completed before august 15

 

हे देखील वाचा :

Chandrashekhar Bawankule | सत्यजीत तांबेंना भाजप पाठिंबा देणार?; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…

CM Eknath Shinde | अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या एकरकमी लाभ योजनेसाठी 100 कोटी, लवकरच 20 हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती करणार

Aurangabad ACB Trap | घराचा उतारा देण्यासाठी 9 हजार रुपये लाच स्वीकारताना ग्रामविकास अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

 

Related Posts