IMPIMP

Maharashtra Jalana IT Raid | जालनामध्ये स्टील फॅक्टरीमध्ये प्राप्तीकर विभागाचा छापा ! 390 कोटींची संपत्ती जप्त, रोकड मोजण्यासाठी लागले 13 तास

by nagesh
Pune Crime News | Cheating With Retired Assistant Commissioner of Police; Extortion was threatened with financial loss

जालना : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Jalana IT Raid | महाराष्ट्रातील जालन्यात प्राप्तीकर विभागाने एका स्टील कारखान्यातून 390 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. उशीरापर्यंत प्राप्तीकर विभागाची कारवाई सुरू होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टील कारखान्याची आणखी अघोषित मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात सर्वाधिक लोखंडी यार्डचे उत्पादन करणार्‍या जालन्यातील स्टील उत्पादकांचे कारखाने, घरे आणि कार्यालयांवर प्राप्तीकर विभागाने छापे टाकले. विभागाने टाकलेल्या या छाप्यांमध्ये सुमारे 390 कोटी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्तेची माहिती समोर आली आहे. 58 कोटी रुपये रोख, 32 किलो सोन्याचे दागिने, हिरे, 16 कोटी रुपयांचे हिरे-मोती आणि सुमारे 300 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. (Maharashtra Jalana IT Raid)

रोकड मोजण्यासाठी टीमला लागले 13 तास

विशेष बाब म्हणजे छापेमारीत एवढी रोकड जप्त करण्यात आली आहे की ती मोजण्यासाठी टीमला तब्बल 13 तास लागले.
प्राप्तीकर विभागाच्या औरंगाबाद पथकाला मिळालेल्या माहितीनुसार,
जालन्यातील 4 बड्या स्टील कारखान्यांनी व्यवसायातून कोट्यवधी रुपयांच्या अतिरिक्त उत्पन्नाची संपूर्ण नोंद न करता रोखीचे व्यवहार केले आहेत.

प्राप्तीकरला चोरीच्या शंका आल्याने छापे टाकण्यात आले असता मोठा काळापैसा उघड झाला.
छाप्यादरम्यान अधिकार्‍यांना कपाटांच्या खाली, खाटांमध्ये आणि कपाटांमध्ये काही बॅगांमध्ये रोख रक्कम सापडली.
सर्वत्र नोटांचे बंडल सापडले. इतकीच रक्कम अन्य एका व्यावसायिकाच्या घरातूनही मिळाली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title : –  Maharashtra Jalana IT Raid | jalana it raid income tax raid at steel factory in maharashtra jalna worth rs 390 crore recovered

हे देखील वाचा :

Laal Singh Chaddha Review | आमिर खानने सर्वकाही जिंकले, ‘लाल सिंह चड्ढा’ प्रत्येक हिंदुस्तानीने पाहिला पाहिजे

Raju Srivastava | कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक, AIIMS मध्ये व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवले

Bank Locker Rules | बदलले बँक लॉकरसंबंधीचे नियम, कोणतेही किमती सामान ठेवण्यापूर्वी जाणून घ्या नवीन नियम

Related Posts