IMPIMP

Maharashtra MLC Election-2022 | भाजप खासदाराच्या ट्विटमुळे राजकारणात खळबळ; म्हणाले – ‘मिशीवाल्या मावळ्याचा बळी जाणार’

by nagesh
Yakub Memon Grave | yakub menon grave beautification controversy shiv sena leader ambadas danve answer to bjp ashish shelar chandrashekhar bawankule criticism

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra MLC Election-2022 | विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान (Maharashtra MLC Election-2022) होत आहे. भाजप (BJP), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), काँग्रेस (Congress) आणि शिवसेनेचे (Shivsena) सर्वच आमदार विधानभवनात पोहोचले आहेत. अनेक आमदारांनी मतदान देखील केले आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात राजकीय शीतयुद्ध रंगलं आहे. अशातच भाजपचे राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे (MP Anil Bonde) यांनी सूचक ट्वीट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना लक्ष्य केलं आहे. त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

अनिल बोंडे यांनी ट्वीट करत महाविकास आघाडीचा एक उमेदवार पराभूत होणार असल्याचा दावा केला आहे. तसेच, मिशीवाल्या मावळ्याचा बळी जाणार असल्याचं म्हटलं आहे. ‘काळ आला होता भाऊ किंव्हा भाईवर, पण मुख्यमंत्रिपद वाचवण्यासाठी बळी जाणार मिशीवाल्या मावळ्याचा,’ असं ट्वीट अनिल बोंडे यांनी केलं आहे. (Maharashtra MLC Election-2022)

 

 

भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये दहाव्या जागेसाठी अटीतटीची लढत होताना दिसत आहे. त्यामुळे बाजी कोण मारणार हे पाहावे लागणार आहे. दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसचा दुसरा उमेदवार असलेल्या भाई जगताप (Bhai Jagtap) यांची जागा धोक्यात असल्याची चर्चा होती. कारण काँग्रेसकडे स्वत:ची 42 मते असून दुसऱ्या उमेदवारासाठी त्यांना अतिरिक्त 10 मतांची जुळवाजुळव करण्याची गरज आहे. दुसरीकडे भाजपने राष्ट्रवादीचे उमेदवार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या पराभवासाठी रणनीती आखल्याची चर्चा आहे.

 

दरम्यान, काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेना आपल्या वाट्याची काही मते देणार असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर शिवसेना उमेदवार आमशा पाडवी (Amsha Padvi) यांनाच धोका निर्माण होणार असल्याचं अनिल बोंडे यांनी आपल्या ट्वीटमधून सुचवलं आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Maharashtra MLC Election-2022 | bjp rajyabha mp anil bonde tweet on shivsena candidate in mlc election 2022

 

हे देखील वाचा :

Maharashtra MLC Election-2022 | पुण्याच्या भाजपा आमदार मुक्ता टिळक मतदानासाठी मुंबईकडे रवाना; म्हणाल्या…

Maharashtra MLC Election-2022 | ‘सत्तेचा माज चालणार नाही, आम्हीच जिंकणार, मला मुळीच चिंता वाटत नाही’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Maharashtra Monsoon Update | राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर; काही ठिकाणी प्रतिक्षा कायम

 

Related Posts