IMPIMP

Maharashtra Monsoon Session | विधिमंडळाच्या पायऱ्यांवर अभूतपूर्व राडा, आमदार एकमेकांच्या अंगावर धावले, धक्काबुक्कीही झाली

by nagesh
Maharashtra Monsoon Session | look at the money that went to baramati then shout mla mahesh shinde told amol mitkari

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Monsoon Session | पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अभूतपूर्व राडा झाल्याचे पहायला मिळाले. गेल्या चार दिवसांमध्ये विरोधकांनी झोंबरी घोषणाबाजी करुन सत्ताधाऱ्यांना जेरीस आणले होते. त्यामुळे बुधवारी सकाळपासून सत्ताधारी आमदार विधिमंडळाच्या पायऱ्यांवर (Maharashtra Monsoon Session) आंदोलन करत होते. यावेळी शिंदे गटातील (Shinde Group) महेश शिंदे (Mahesh Shinde) आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari)  भिडल्याचं चित्र पहायला मिळालं. महाराष्ट्रात एकीकडे शेतकरी अडचणीत आहेत. अनेक प्रश्न राज्यासमोर उभे आहेत. असे असताना लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहात पाठवलेल्या या प्रतिनिधींकडून अशी कृती निश्चितच लाजिरवाणी असल्याचे बोलले जात आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पावसाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Monsoon Session) पहिल्या चार दिवसांमध्ये महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर केलेल्या घोषणाबाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. ‘आले रे आले गद्दार आले’, ’50 खोके एकदम ओक्के’, ‘गद्दारांना भाजपची ताटवाटी, चलो गुवाहाटी’, अशा एकापेक्षा एक झोंबणाऱ्या घोषणांनी महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) शिंदे गट आणि भाजपला जेरीस आणले होते. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची चांगलीच कोंडी होताना दिसत होते. त्यामुळे आता अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी भाजप-शिंदे गटाने आपली रणनीती बदलल्याचे दिसत आहेत.

 

शिंदे गटाचा इशारा

हा गोंधळ घडला त्यावेळी तिथं उपस्थित असणारे शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले (MLA Bharat Gogavale) म्हणाले, आमच्यावर विरोधक आरोप करत होते.
आता आम्ही त्यांच्या भ्रष्टाचारावर आवाज उठवण्यासाठी पायऱ्यांवर आंदोलन केले. आम्ही कुणाला पाय लावत नाही.
आम्हाला कुणी लावत असेल तर आम्ही सोडणार नाही. कुणी अंगावर आलं तर आम्ही शिंगावर घेऊ.
आम्ही कुणाच्या आत जात नाहीत, आमच्यात आत कुणी येऊ नये, असं गोगावले म्हणाले.
आमच्या मार्गात आलं तर आम्ही सोडणार नाही, असंही ते म्हणाले.
त्यांनी आम्हाला धक्काबुक्की नाही केली, आम्ही त्यांना धक्काबुक्की केली, असंही गोगावले म्हणाले.
आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, आम्ही डरफोक नाही.

 

Web Title :- Maharashtra Monsoon Session | maharashtra assembly session scuffle between bjp eknath shinde camp and mahavikas agahdi mlas shivsena ncp and congress

 

हे देखील वाचा :

Pune PMC Recruitment 2022 | पुणे महापालिका मेगाभरती ! अर्जांमध्ये त्रुटी आढळलेल्या ‘त्या’ 300 उमेदवारांनाही संधी दिली जाणार

Gold-Silver Price Today | सोने-चांदीच्या दरात आज पुन्हा झाला बदल, जाणून घ्या नवीन दर

Pune Mumbai Expressway | अपघात रोखण्यासाठी पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर विविध उपाययोजना; विधानपरिषदेत फडणवीस यांची माहिती

 

Related Posts