IMPIMP

Maharashtra Monsoon Update | गोवा सीमेवर मान्सून रेंगाळला ! महाराष्ट्रात ‘या’ दिवशी बरसणार सरी; हवामान खात्याचा अंदाज

by nagesh
Maharashtra Rains Update | weather report vidarbha gadchiroli konkan marathawada maharashtra rain updates

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Monsoon Update | गेल्या काही दिवसापासून पावसाची (Maharashtra Rains) आतुरता लागली आहे. भारतीय हवामान खात्याच्या Indian Meteorological Department (IMD) अंदाजानुसार, मोसमी पावसाचे लवकरच आगमन होईल असं काही दिवसापूर्वी सांगितलं होतं. मात्र ती तारीख उलटून गेली आहे. मोसमी पाऊस सध्या कर्नाटक-गोवा (Karnataka-Goa Border) सीमेलगत रेंगाळत असल्याने महाराष्ट्रात (Maharashtra Monsoon Update) येण्यास काही विलंब लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

केरळमध्ये (Kerala) वेळेपूर्वी दाखल झालेल्या मान्सूनच्या वाटचालीला वातावरणातील बदलांमुळे काहीसा ब्रेक लागला आहे. त्यामुळे आता आगामी चार ते पाच दिवसामध्ये महाराष्ट्रात (Maharashtra Monsoon Rains) मोसमी पावसाच्या सरी बरसणार असल्याची शक्यता आहे. 10 किंवा 12 जूनला मान्सूनचं तळकोकणातून राज्यात आगमन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाकडे डोळे लावून बसलेल्या नागरिकांना आता आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. (Maharashtra Monsoon Update)

एकीकडे उन आणि काही भागात पाऊस असं वातावरण निर्माण झालं आहे.
बहुतांश राज्यातील काही भागात उन्हाचा तडाका कायम असल्याचं चित्र आहे.
त्यामुळे जून महिना लागला असला तरी अजूनही नागरीकांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत.
दरम्यान, दुसरीकडे रत्नागिरीच्या लांजा तालुक्याला वळवाच्या पावसाने चांगलेच झोडपले आहे.
संध्याकाळी अचानक भरून आलं आणि वादळी वा-यासह मुसळधार पाऊस झाला.
यामुळे हवामान खात्यानं (IMD) दिलेला अंदाज खरा ठरला आहे.

 

Web Title :- Maharashtra Monsoon Update | mansoon 2022 karnataka goa border Waiting for maharashtra monsoon rains

 

हे देखील वाचा :

ACB Trap On Police Sub Inspector | आर्थिक गुन्हे शाखेचा पोलीस उपनिरीक्षक (PSI) 3 हजाराची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

Pradip Bhide Passes Away | दूरदर्शनचा चेहरा ‘हरपला’ ! सुप्रसिध्द वृत्तनिवेदक प्रदीप भिडे याचं 65 व्या वर्षी निधन

Pune Crime | पर्वती दर्शनमधील जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा; दुकानात व दुकानाबाहेर बाहेर बाईकवर सुरु होता जुगार, 16 जणांवर गुन्हा दाखल

 

Related Posts