IMPIMP

Best Tax Saving Investments and Tax Calculations | ‘या’ 4 योजनांमध्ये मिळतो जबरदस्त रिटर्न, गुंतवणुकदार करू शकतात 1.50 लाख रुपयांपर्यंत टॅक्सची बचत

by nagesh
ITR Verification | know all ways to verify income tax return

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाBest Tax Saving Investments and Tax Calculations | सर्व करदात्यांना प्राप्तीकर कायदा 80 सीसी अंतर्गत गुंतवणुकीवर 1.50 लाख रुपयांच्या कर सवलतीचा दावा करण्याची संधी आहे. या नियमाद्वारे गुंतवणूकदार त्यांचे पैसे वाचवू शकतात. बाजारात असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत जिथे गुंतवणूक करून या नियमाचा फायदा घेतला जाऊ शकतो. (Best Tax Saving Investments and Tax Calculations)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

परंतु बहुतेक करदात्यांना या गुंतवणुकीवर गॅरंटेड रिटर्न हवा असतो. अशा चार गुंतवणुक योजना जाणून घेऊया ज्याद्वारे करदाते कर वाचवू शकतात आणि चांगला रिटर्न मिळवू शकतात.

 

सुकन्या समृद्धी योजना Sukanya Samriddhi Account (SSY)

सुकन्या समृद्धी योजना पालक त्यांच्या 10 वर्षांखालील मुलीच्या नावाने उघडू शकतात. या खात्याद्वारे गुंतवणूकदार 1.50 लाख रुपयांपर्यंत कर वाचवू शकतात.

सध्या या योजनेवर सरकारकडून 7.60 टक्के व्याज दिले जात आहे. या योजनेत फक्त 250 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते. मुलीचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त किंवा ती 10 वी उत्तीर्ण झाल्यानंतर 50% पर्यंत ठेव रक्कम काढता येते. (Best Tax Saving Investments and Tax Calculations)

 

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड Public Provident Fund (PPF)

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) ही देखील एक लोकप्रिय कर बचत योजना आहे. या सरकारी योजनेवर सध्या 7.1 टक्का व्याज दिले जात आहे. या योजनेत गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार 5 वर्षांनंतर पैसे काढू शकतात.

पीपीएफ खाते 15 वर्षांत मॅच्युअर होते. या योजनेत किमान 500 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. पीपीएफ गुंतवणूकदार 80 सीसी अंतर्गत 1.50 लाख रुपयांच्या कर सवलतीचा दावा देखील करू शकतात.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सिनियर सिटिझन सेव्हिंग स्कीम Senior Citizen Saving Scheme (SCSS)

ही देखील एक कर बचत योजना आहे. मात्र 60 वर्षांवरील लोकच ही योजना उघडू शकतात.
यामध्ये 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते.

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर सध्या सरकार 7.4% व्याज देत आहे.
वर्षभरात 50,000 रुपयांपेक्षा जास्त व्याज राहिल्यास टीडीएस कापला जाईल. याशिवाय गुंतवणूकदारांना या योजनेतून वेळेपूर्वी पैसे काढायचे असतील तर त्यांना दंड भरावा लागतो.

 

5 वर्षांसाठी बँक फिक्स्ड डिपॉझिट
बँक एफडीद्वारेही कर बचत करता येते. ही अशी गुंतवणूक आहे जिथे रिटर्नची हमी असते.
यामुळेच गुंतवणूकदार बँक एफडीमध्ये भरपूर पैसे गुंतवतात.

एफडी गुंतवणूकदार गॅरंटेड रिटर्नसह 1.50 लाख रुपयांपर्यंत कराचा दावा करू शकतात.
बँकांकडून ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर अतिरिक्त व्याज दिले जाते. साधारणपणे, 5 वर्षांसाठी बँक एफडी सर्वोत्तम मानली जाते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Best Tax Saving Investments and Tax Calculations | strong returns are available in these 4 schemes investors can also save tax up to rs 1 50 lakh

 

हे देखील वाचा :

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबंधानंतर विवाहाला नकार; प्रियकरासह त्याच्या आईवडिलांवर गुन्हा दाखल

Nitesh Rane On Sanjay Raut | नितेश राणेंचा संजय राऊतांवर जोरदार निशाणा; म्हणाले – ‘ठाकरेंनंतर छत्रपतींच्या घरात आग लावली’

Morgaon-Jejuri Road Accident | दुर्देवी ! जेजुरी देवदर्शन करून परतणाऱ्या युवकाचा अपघाती मृत्यू

 

Related Posts