IMPIMP

Maharashtra NCP Crisis | ‘आधीच फेल झालेल्या डबल इंजिनाला अजून एक चाक लागलं’, आदित्य ठाकरेंचे टिकास्त्र

by nagesh
Maharashtra NCP Crisis maharashtra ncp political crisis aaditya thackeray first reaction on ajit pawar joining shinde fadanvis govt

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra NCP Crisis | शिवसेनेत बंड (Rebellion in Shiv Sena) होऊन एक वर्ष होत असताना राष्ट्रावादी काँग्रेस (NCP Rebellion) पक्षात बंड झाले. अजित पवार (Ajit Pawar) यांनी काही आमदारांना हाताशी घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड केलं. अजित पवार आणि त्यांच्या सोबत गेलेल्या आमदारांनी राष्ट्रावादीत बंड (Maharashtra NCP Crisis) केल्यानंतर महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी टिकास्त्र सोडलं आहे. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan), नाना पटोले (Nana Patole), संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यासह आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनीही बंडावर प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत आजच्या शपथविधीवर ट्विट करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलेले प्रश्न कोणते?

मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) झाला. आधीच फेल झालेल्या डबल इंजिनाला अजून एक चाक लागलं. चला, पण ज्या गद्दारांना मंत्रीपदाची स्वप्नं पडत होती, त्यांना 1 वर्ष उलटल्यावरही काय मिळालं??

https://twitter.com/AUThackeray/status/1675491288249139202?s=20

रायगड असो, नाशिक असो, जळगाव असो… जे गद्दार स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांचा त्रास होतोय असं सांगत होते, आता राष्ट्रवादीच्या त्याच नेत्यांना मंत्रीपदं मिळाल्यावर ह्यांचं काय होणार? आता पुन्हा गुवाहाटी?? (Maharashtra NCP Crisis)

एक गद्दार आज टीव्हीवर म्हणाले, “145 जागा जिंकायच्या असतील तर ह्यांना सोबत घ्या”, असं वरिष्ठांनी सांगितलं. म्हणजे हे सिद्ध झालंय की मिंधेंकडे क्षमताच नाही! नाहीतर एवढं गद्दारांचं बहुमत असताना आजचा कार्यक्रम कशाला??

आणि सर्वात महत्वाचं… आम्ही काँग्रेस (Congress) आणि NCP सोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं,
असं म्हटलं गेलं. मग आज भाजपाने (BJP) काय केलं?? तेही सत्तेसाठी आकड्यांची गरज नसताना!

एक सिद्ध झालं, तुमच्या गद्दारीमागे फक्त आणि फक्त स्वार्थ आहे! ‘स्वार्थी विरुद्ध स्वाभिमानी’,
अशी ही लढाई असणार आहे!, असं आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Web Title : Maharashtra NCP Crisis maharashtra ncp political crisis aaditya thackeray first reaction on
ajit pawar joining shinde fadanvis govt

Related Posts