IMPIMP

Maharashtra Police | मनसेचे गृहमंत्री फडणवीसांना पत्र, पोलिस बांधवांनाही दिवाळी बोनस द्या

by nagesh
Maharashtra Police | diwali give diwali bonus to police brothers too another letter from mns to fadnavis

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Police | सणवार असो, कोणतीही आपत्ती असो की संकट असो, सदैव सतर्क आणि कार्यरत असणार्‍या महाराष्ट्रातील पोलीस (Maharashtra Police) बांधवांची दिवाळी त्यांना बोनस देऊन गोड करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस मनोज चव्हाण (MNS Manoj Chavan) यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (HM Devendra Fadnavis) यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मनोज चव्हाण यांनी पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police ) बांधव हे सण, उत्सव, नैसर्गिक आपत्तीसह अतिरेकी कारवायांमध्ये कर्तव्य बजावत असतात. गर्दीत वर्दी असते म्हणूनच धर्माचा उत्सव उत्साहात साजरा होतो. त्यामुळेच, सणासुदीच्या काळात तरी महाराष्ट्र पोलिसांना आर्थिक समाधान द्यायला हवे. यंदा दिवाळीला पोलिस बांधवांना बोनस (Diwali Bonus) द्यावा, अशी मागणी या पत्रात चव्हाण यांनी केली आहे.

 

 

पोलिस दलात काम करताना कर्मचार्‍यांना सातत्याने जोखीमीचा सामना करावा लागतो. कोरोना (Corona) काळात पोलिसांनी अहोरात्र सेवा केली. यामध्ये अनेक पोलिस कर्मचार्‍यांना आपले प्राण देखील गमवावे लागले होते. अशाप्रकारे वर्षभर इमाने इतबारे सेवा करूनही शासनाकडून दिवाळीचा बोनस देण्यासाठी हात आखडता घेतला जातो.

 

एकीकडे पोलिसांना अतिशय तुटपुंजी मदत कुपनच्या रूपात गेल्या वर्षी करण्यात आली होती. तर दुसरीकडे महापालिका, बेस्ट कर्मचारी आणि खाजगी कर्मचार्‍यांना भरघोस बोनस देण्यात आला.
हा भेदभाव न कळणारा आहे. गेल्यावर्षी केवळ 750 रुपयांचे कुपन पोलिसांना देण्यात आले होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राज्यात सरकारी कर्मचार्‍यांना (State Government Employees) बोनस देऊन त्यांच्या कुटुंबाची दिवाळी गोड
केली जाते. मात्र, राज्यातील पोलीस विभाग या निर्णयाला अपवाद असतो.
पोलिसांना बोनस किंवा अ‍ॅडव्हान्स मिळत नसल्याने पोलीस खात्यात दिवाळीला नाराजीचा सूर पाहायला मिळतो.
यामुळे मनसेने दिवाळीला पोलिसांनाही बोनस देण्याची मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
काही दिवसांपूर्वी, धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रात (Dhule Police Training Centre) कार्यरत
पोलीस निरीक्षक आर. आर. चव्हाण (Police Inspector R. R. Chavan) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
(CM Eknath Shinde) यांना पत्र पाठवून पोलिसांना एक महिन्याचे वेतन दिवाळी बोनस म्हणून देण्याची मागणी
केली आहे.

 

 

Web Title :- Maharashtra Police | diwali give diwali bonus to police brothers too another letter from mns to fadnavis

 

हे देखील वाचा :

Gold Price Today | दिवाळी-धनत्रयोदशीपूर्वी सोने स्वस्त, चांदीची चमक वाढली, जाणून घ्या आजचे दर

Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर भीषण अपघात, रोहयो मंत्री संदिपान भुमरेंच्या मावस भावाचा मृत्यू

Pune Crime | कुटुंब कल्याण विभागाचे कंत्राट मिळाल्याचे भासवून व्यावसायिकाची ३९ लाखांची फसवणुक; बनावट वर्क ऑर्डर तयार करुन करायला लावली गुंतवणुक

 

Related Posts