IMPIMP

Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर भीषण अपघात, रोहयो मंत्री संदिपान भुमरेंच्या मावस भावाचा मृत्यू

by nagesh
Mumbai-Pune Expressway | minister sandipan bhumre cousin died in road accident at pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोड ग्रामपंचायतचे माजी सरपंच तथा रोहयो मंत्री संदिपान भुमरे (Minister Sandipan Bhumre) यांचे मावस भाऊ अंबादास नरवडे (Ambadas Narvade) यांचा अपघातात मृत्यू (Accidental Death) झाला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरुन (Mumbai-Pune Expressway) प्रवास करत असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला. त्यात त्यांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहे. हा अपघात पहाटे चारच्या सुमारास मुंबई-पुणे महामार्गावरील (Mumbai-Pune Expressway) कामशेतजवळ झाला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अंबादास नरवडे हे आपल्या काही सहकाऱ्यांसह इनोव्हा गाडीतून मुंबईवरुन पुण्याच्या (Mumbai-Pune Expressway) दिशेने येत होते. पहाटे चारच्या सुमारास कामशेत जवळ इनोव्हा गाडी टेम्पोला मागून धडकली. त्यामुळे इनोव्हा डिव्हायडरवर आदळली. त्याचवेळी मागून आलेल्या एका चारचाकी वाहनाने आणि ट्रकने एकामागोमाग धडक दिली. अचानक झालेल्या या विचित्र अपघातामुळे नरवडे यांचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

 

अपघातात जखमी झालेल्यांवर तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करुन तपास सुरु केला आहे.
अपघाताची माहिती मिळताच मंत्री संदिपान भुमरे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
अंबादास नरवडे यांच्या अपघाती निधनाची माहिती मिळताच पैठण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

 

Web Title :- Mumbai-Pune Expressway | minister sandipan bhumre cousin died in road accident at pune

 

हे देखील वाचा :

Pune Crime | कुटुंब कल्याण विभागाचे कंत्राट मिळाल्याचे भासवून व्यावसायिकाची ३९ लाखांची फसवणुक; बनावट वर्क ऑर्डर तयार करुन करायला लावली गुंतवणुक

Uday Samant | ‘मी हात जोडून विनंती करतो…’ उदय सामंतांच्या सूचक ट्वीटची राजकीय वर्तुळात चर्चा, कुणाच्या दिशेनं रोख?

Maharashtra Crime | थायलंडला नोकरीला जाताना सावधान ! ठाण्याच्या तरुणाचे खंडणीसाठी अपहरण, अमेरिकन नागरिकांची फसवणुक करण्याची केली जाते सक्ती

Pune Crime | इमारतीवरुन पडून कामगाराचा मृत्यु; बिल्डर, ठेकेदारावर गुन्हा दाखल

 

Related Posts