IMPIMP

Maharashtra Police Havaldar Suspended | दलालांशी हातमिळवणी ! पोलिस हवालदार बडतर्फ, गुप्तचर विभागाचे 2 अधिकारीही प्रकरणात सहभागी

by nagesh
Pune Crime News | Chandannagar Police Station - Police constable rapes woman by showing fear of implicating her son and husband in a false crime, police constable accused of extorting 1 lakh by threatening defamation by implicating her in the crime of rape

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Police Havaldar Suspended | मानवी तस्करी करणाऱ्या दलालांशी हातमिळवणी करून तब्बल 43 लोकांना बेकायदेशीरपणे परदेशात पाठवण्यास मदत करणाऱ्या मुंबई पोलीस (Mumbai Police) हवालदाराची हकालपट्टी करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. तसेच गुप्तचर विभागाचे (Intelligence Bureau) दोन अधिकारीही या रॅकेटमध्ये सामील असल्याची माहिती मिळत आहे. (Maharashtra Police Havaldar Suspended)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, हवालदार संजय थोरात यांची 2017 मध्ये इमिग्रेशन आणि पासपोर्ट क्लिअरन्सची देखरेख करणाऱ्या विशेष शाखा II मध्ये नियुक्ती झाली होती. मानवी तस्करी करणाऱ्या टोळ्यांशी हातमिळवणी करून किमान 43 लोकांना बनावट पासपोर्ट वापरून परदेशात पाठविले. त्यांच्यावर हे आरोप झाल्यानंतर पाच वर्षे त्यांची चौकशी झाली.

 

या चौकशीनंतर दोषी आढळल्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात आले. आता, 25 नोव्हेंबर रोजी थोरात यांना कार्यमुक्तीचा आदेश जारी करण्यात आले आहेत.
पोलिसांनी सांगितले की, थोरात याने मानवी तस्करी करणाऱ्या दलालांशी हातमिळवणी केली होती. 2017 मध्ये बनावट आणि फसवणूक उघडकीस आल्यानंतर सहार पोलीस ठाण्यात (Sahar Police Station) भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर तपासात गुप्तचर विभागाचे दोन अधिकारीही या प्रकरणात सहभागी असल्याचे आढळून आले. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.

 

 

Web Title :- Maharashtra Police Havaldar Suspended | dismissal of mumbai police havaldar who helped send people abroad illegally

 

हे देखील वाचा :

Vicky Kaushal | विकी कौशलचा ‘तो’ डायलॉग चाहत्यांचं लक्ष वेधलं; व्हिडिओ व्हायरल

Kraigg Braithwaite | क्रेग ब्रेथवेटने ऑस्ट्रेलियात केला विक्रम! अशी कामगिरी करणारा वेस्ट इंडीजचा तिसरा कर्णधार

 

Related Posts