IMPIMP

Maharashtra Police | देशातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्रातील 3 पोलीस स्टेशनचा समावेश

by nagesh
Maharashtra Police | jayant patil inform about maharashtra three police station included in national best list

सांगली : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Police | सांगली जिल्ह्यातील (Sangli) विश्रामबाग येथे नूतन पोलीस मुख्यालयाच्या (New police headquarters) इमारतीचे भूमिपूजन राज्याचे जलसंपदा मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जंयत पाटील (Jayant Patil) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जयंत पाटील यांनी देशातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशनमध्ये (The best police station) महाराष्ट्रातील तीन पोलीस ठाण्यांचा समावेश झाल्याची माहिती दिली आहे. (Maharashtra Police)

यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातील (Maharashtra Police) यवतमाळ (yavatmal), चंद्रपूर (Chandrapur) आणि शिराळा (shirala police station) येथील पोलीस ठाण्यांचा समावेश आपल्या देशातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशनमध्ये झाला आहे. सांगली जिल्हा पोलिस प्रमुख दीक्षित गेडाम (Dikshit Gedam IPS) यांनी सर्व पोलीस स्टेशन आयएसओ (ISO) प्रमाणित करण्याची मोठी मोहीम हाती घेतली. राज्यात अनेक चांगले पोलीस स्टेशन आहेत. माझी पहिल्या आणि दुसऱ्या रांगेत बसलेल्या नेत्यांना विनंती आहे कोणतीही केस रदबदली घेऊन न जाता फक्त चहा घ्यायला जाऊन या. असं पाटील म्हणाले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पुढे पाटील म्हणाले, खरंतर पोलीस दलाला अधिक अधिकार दिले पाहिजे असं माझं मत आहे. हे मत आज नाही, तर मी गृहमंत्री होण्याच्या आधीपासून आहे. ते यासाठी की एक पोलीस उभा राहिला तर त्याच्या दोन्ही बाजूला 1 किलोमीटर कुणाचा आवाज काढण्याची हिंमत झाली नाही पाहिजे. पोलिसांचे (Maharashtra Police) अधिकार वाढवले तर त्यांचं नैतिक वजन वाढतं. असं ते म्हणाले.

दरम्यान, पोलिसांनी ही व्यवस्था दुरुस्त केली आहे. हे पाहण्याचं आपल्याला भानच नसतं.
सरकारी अधिकाऱ्याला देखील मन असतं, ह्रदय असतं. आपण त्याला प्रोत्साहन देण्याचं काम केलं पाहिजे.
आपण केस असेल तरच फोन करतो. पोलिसांना फोन करून दम देण्याची प्रथा आता वाढली आहे.
‘हे करा, ते करा, बघतोच तुम्हाला, इकडं घालवतो, तिकडे घालवतो’ असं बोललं जातं.
त्यांना नोकरीच करायची असते, पण ही लोकं काम करत असतात, असं देखील पाटील यांनी म्हटलं आहे.

Web Title :- Maharashtra Police | jayant patil inform about maharashtra three police station included in national best list

हे देखील वाचा :

7th Pay Commission | ‘या’ सरकारी कर्मचार्‍यांचे होणार मोठे नुकसान, निम्माच मिळणार दिवाळी बोनस

Bank Holidays | 5 दिवस बँका बंद राहणार; पहा सुट्ट्यांची यादी

Indian Currency | चलनी नोटा कशा तयार केल्या जातात? तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या

Pune Crime | तृतीय पंथ्यांचं वेषांतर करून चोऱ्या करणाऱ्या भामट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Related Posts