IMPIMP

Indian Currency | चलनी नोटा कशा तयार केल्या जातात? तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या

by nagesh
Earn Money | start a business in less investment you can also handle your job with this

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  Indian Currency | जीवनात पैशाला फार महत्त्व आहे. कोणतीही वस्तु खरेदी करायची म्हंटलं तर आपणाकडे पैसे असणे आवश्यक आहेत. प्रत्येक जण पैसे कमवण्यासाठी धडपडत असतो. सकाळी प्रत्येक जण बाहेर पडताना खिशात काही नोटा घेतो. कारण व्यवहारासाठी त्याला या नोटांची आवश्यकता असते. सध्या ऑनलाइन व्यवहार प्राधान्य देत असले तरी चलनी नोटांचे (Indian Currency ) महत्व कमी झाले नाही. मात्र या चलनी नोटांची निर्मिती कशी होते. त्याची नेमकी प्रक्रिया काय आहेत, नियम काय आहेत असे अनेक प्रश्न आपणाला पडतात. काही जण तर कागदापासून या नोटा तयार केल्या जातात असे सांगतात. परंतु हे सर्व चुकीचे आहे. कारण कापसाचा वापर करून या नोटा तयार केल्या जातात.

चलनी नोटांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. अतिवापरामुळे या नोटा खराब होतात. किंबहुना फाटतात. त्यामुळे दीर्घकाळ नोटा चलनात
राहण्यासाठी नोटांची निर्मिती कापसापासून केली जाते. नोटांमध्ये १०० टक्के कापसाचा वापर केला जात असल्याचं `आरबीआय`ने (RBI) स्पष्ट केलं
आहे. नोटा जारी करण्याचा अधिकार केवळ रिझर्व्ह बॅंकेलाच (RBI) आहे. केंद्र सरकार आणि अन्य भाग धारकांशी सल्लामसलत करून रिझर्व्ह बँक
नोटांच्या पुरवठ्यासाठी विविध चलन छापखान्यांसह मूल्य आणि मागणीनुसार एका वर्षात आवश्यक असलेल्या नोटांच्या प्रमाणाचा अंदाज लावते. दरम्यान, स्वच्छ नोट धोरणानुसार चलनातून परत आलेल्या म्हणजे फाटक्या, मळक्या, खराब झालेल्या नोटांची (Indian Currency ) छाननी करून रिझर्व्ह बँक चलनासाठी योग्य नोटा पुन्हा जारी करते. तर खराब, मळक्या आणि फाटक्या नोटा नष्ट करते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

कागदापासून नोटांची निर्मिती होते असे म्हणणे चुकीचे आहे. कारण कापसापासून नोटांची निर्मिती होते. कागदापेक्षा कापूस अधिक टिकाऊ आणि मजबूत असतो. त्यामुळे केवळ भारतातच (Indian Currency ) नाही तर अन्य देशांमध्येही कापसापासून नोटांची निर्मिती केली जाते. कापसाच्या धाग्यात लेनिन नावाचं फायबर असतं. नोटा तयार करताना कापसासोबत गॅटलीन आणि आधेसिवेस नावाच्या द्रावणाचा वापर केला जातो. यामुळे नोटेचं आयुष्य वाढतं. सुरक्षेच्या दृष्टीने भारतीय नोटांमध्ये विविध फीचर्सचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे बनावट नोटांना पायबंद बसतो. इतकेच नाही तर भारतीय नोटांचं डिझाइन सातत्यानं बदललं जात असल्याने नोटा अधिक सुरक्षित आणि टिकाऊ आहेत.

Web Title: Indian Currency | indian currency notes not made by paper know the actual material use in that

हे देखील वाचा :

Pune Crime | तृतीय पंथ्यांचं वेषांतर करून चोऱ्या करणाऱ्या भामट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Yuvika Chaudhary Arrest | वादग्रस्त विधानामुळे अभिनेत्री युविका चौधरीला अटक

TRAI Channel List | 1 डिसेंबरपासून TV पाहणे देखील महागणार, करावा लागेल 50 टक्केपेक्षा जास्त खर्च

Related Posts