IMPIMP

Maharashtra Political Crisis | सुप्रीम कोर्टातील निर्णय व्हायला चार ते पाच वर्षे लागतील, शिंदे गटाच्या आमदाराचे सूचक विधान

by nagesh
Maharashtra Political Crisis | supreme court will decision tomorrow on the dispute between shiv sena and shinde group rahul shewale and anil desai going to delhi

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Political Crisis | शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटाचा (Shinde Group) वाद सुप्रीम कोर्टात (Supreme Court) पोहोचला आहे. या वादावर नुकतीच सुनावणी पार पडली. यामध्ये राज्यातील सत्तासंघर्षाचे प्रकरण आता 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे (Constitutional Bench) सोपविण्यात आले आहे. तसेच जोपर्यंत सुनावणी सुरु आहे, तोपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नका, असे आदेश न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला (Central Election Commission) दिले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या या सुनावणीनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे वेळ मागितला. यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेची मागणी मान्य करत मोठा दिलासा दिला. यानंतर शिंदे गटातील आमदाराने ठाकरेंच्या शिवसेनेला ( Maharashtra Political Crisis) आव्हान दिले आहे.

 

शिवसेनेची निशाणी धनुष्यबाण (Dhanushya Ban Symbol) आम्हालाच मिळेल आणि पुन्हा आम्हीच आमदार होऊ असं सांगत भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी उद्धव ठाकरे गटाला आव्हान दिले आहे. सुप्रीम कोर्टात सुरु असलेली शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) ही कायदेशीर लढाई दिर्घकाळ चालेल. याचा निर्णय व्हायला चार ते पाच वर्षे लागतील असे संकेत भरत गोगावले यांनी दिले आहेत. तसेच शिवसेनेची (Maharashtra Political Crisis) धुनष्यबाण ही निशाणी शिंदे गटालाच मिळेल असा दावाही गोगावले यांनी केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आपण पुन्हा सत्तेत येऊ

अनेक लोकांनी देव पाण्यात बुडवले होते. सुप्रीम कोर्टात सुनावणी होईल, शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरतील.
यानंतर आमचे सरकार कोसळेल, अशी आस अनेकजण लावून बसले आहेत.
मात्र तुम्हाला मी आज सांगतो की, आपली तक्रार घटनापीठाकडे गेली आहे. हे आता जवळजवळ चार ते पाच वर्षे चालणार आहे.
दुसरी निवडणूक जिंकून आपण पुन्हा सत्तेत येऊ, सात तारखेला धनुष्यबाण निशाणीची तारीख आहे ती पण आम्ही घेतो,
तेही तुम्हाला आज सांगतो, असे भरत गोगावले यांनी एका सभेत म्हटले आहे.

 

Web Title : –  Maharashtra Political Crisis | cm eknath shinde group and mla bharat gogawale statement over maharashtra political crisis shivsena

 

हे देखील वाचा :

Pune Crime | करार केला नाहीच, रजिस्ट्रेशनची फीही केली हडप; महिला वकिलासह दोघांवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात FIR दाखल

CM Eknath Shinde | गणेशभक्तांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा ! गणेश भक्तांच्या वाहनांना मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मिळणार ‘ही’ खास सुविधा

Pune Crime | पतीला संबंधाबाबत सांगण्याची धमकी देऊन महिलेवर लैंगिक अत्याचार, हडपसर परिसरातील घटना

 

Related Posts