IMPIMP

Maharashtra Political Crisis | शेवट गोड करा, त्यातच महाराष्ट्राचं भलं आहे; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंना अल्टिमेटम

by nagesh
Maharashtra Political Crisis | decide to form an alliance with bjp today an ultimatum to uddhav thackeray of shinde group maharashtra political crisis

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनMaharashtra Political Crisis | महाराष्ट्रात जे काही घडतंय त्याला उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) आशीर्वाद असावा असं आम्हाला वाटतं. भाजप-शिवसेना ही नैसर्गिक युती (BJP-Shivsena Alliance) आहे. आगामी महापालिका निवडणुकीत (Municipal Elections) शिवसेनेची सत्ता अबाधित (Maharashtra Political Crisis) राहिली पाहिजे. आमचे बंड उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध नसून आमच्या पक्षाला संपवणार आहे त्यांच्या विरुद्ध आहे. हात जोडून विनंती करतो, आम्ही सगळं विसरुन जातो. जनतेने जो निर्णय घेतला त्याच्या बरोबर जाऊया, आजचा शेवटचा दिवस आहे, कितीवेळ आम्ही आवाहन करणार, शेवट गोड करा अशी विनंती शिंदे गटाचे (Eknath Shinde Group) आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आमचा संयम तुटत चालला आहे. दिल्लीतील भाजप नेत्यांशी उद्धव ठाकरे यांनी बोलावे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री (CM) झाले तर उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादाने व्हावेत अशी इच्छा आहे. कुठेतरी भाजप-शिवसेनेचं वितुष्ट संपवावं, शेवट गोड व्हावा. भाजपाचे प्रमुख तुम्हाला लहान भाऊ मानतात. तुम्ही थेट त्यांच्याशी बोला, असं आवाहन केसरकर यांनी केले आहे.

आमच्यावर गद्दारीचा शिक्का का मारताय
दिपक केसरकर म्हणाले, ठाकरे कुटुंबाची (Thackeray Family) बदनामी होत असताना मी सगळ्यात आधी पुढे आलो.
मला गद्दार म्हणण्याचा नैतिक अधिकार शिवसैनिकांना नाही. चांगल्या गोष्टी घडत नसतील तर त्याला जबाबदार त्या गोष्टी न घडवणारेही आहेत.
आमच्यावरील टीका किती सहन करायची? 17 केसेस आमच्यावर आहे. गुलाबराव पाटील (Gulabrao Patil),
दादा भूसे (Dada Bhuse), संजय राठोड (Sanjay Rathod) यासारखे किती शिवसैनिक आहेत ज्यांनी सेनेसाठी संघर्ष भोगलाय.
आमच्यावर गद्दारीचा शिक्का का मारतायेत. कुणीही तुमच्या संपर्कात नाही. तत्वांशी जोडले आहेत.
एक आमदार पाच दिवसांचे फाईव्ह स्टार हॉटेलचं बिल भरु शकत नाही. शेवट गोड करा, त्यातच महाराष्ट्राचं भलं आहे,
असा अल्टिमेटम शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | decide to form an alliance with bjp today an ultimatum to uddhav thackeray of shinde group maharashtra political crisis

 

हे देखील वाचा :

Eknath Shinde | रॅडिसनबाहेरुन एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले – ‘लवकरच मुंबईत परतणार..’

Mohan Bhagwat | ‘हिंदू-मुसलमान असा भेद करून राज्य करायचे नसते’ – मोहन भागवत

Pune Crime | आजोबांना दिलेले उसने पैसे परत मागितल्याने मित्रावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

 

Related Posts