IMPIMP

Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे गटाच्या 34 आमदारांचं विधानसभा उपाध्यक्षांना पत्र, जाणून घ्या

by nagesh
Deepak Kesarkar | it is illegal to remove eknath shinde from the post of shiv sena leader say deepak kesarkar

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइनMaharashtra Political Crisis | विधान परिषदेच्या निकालानंतर मंत्री एकनाथ शिंदे (Shivsena Leader Eknath Shinde) यांच्या बंडाने शिवसेनेत मोठी खळबळ माजली आहे. शिदे आणि समर्थक आमदार पक्षनेतृत्वाच्या विरोधात गेल्याने (Maharashtra Political Crisis) राज्यात महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) सत्ता धोक्यात आली आहे. शिंदे यांच्याकडे 34 आमदारांचे पाठबळ असून याबाबत आता त्यांनी विधानसभेच्या उपाध्यक्षांना पत्र पाठवल्याचे उघड झाले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Party Chief Uddhav Thackeray) यांनी शिंदे यांची गटनेते (Group Leader) पदावरुन हकालपट्टी केली. त्याऐवजी अजय चौधरी (Ajay Chaudhary) यांची नेमणूक केली. त्यानंतर मुख्य प्रतोद सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांच्याकडून सर्व आमदारांना पत्र पाठवलं. यात 22 जून रोजी संध्याकाळी 5 वाजता होणाऱ्या बैठकीसाठी उपस्थित राहण्याचा आदेश दिला. तसेच उपस्थित राहिले नाही तर आपण शिवसेना पक्ष सोडत असल्याच गृहतित धरुन सदस्यत्व अपात्र करण्याची कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले.(Maharashtra Political Crisis)

 

शिवसेनेच्या या खेळीवर एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. त्यांनी त्यांच्या समर्थ 34 शिवसेना आमदारांचे (MLA) पत्र विधान भवनाला पाठवलं. या पत्रात 2 ठराव आमदारांनी मांडल्याचे कळवलं आहे. यात 2019 मध्ये एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली होती. ती यापुढेही कायम राहील असा ठराव आहे. तसेच मुख्य प्रतोद पदी आमदार भारत गोगावले (Bharat Gogavale) यांची निवड करण्यात आल्याचं सांगत सुनील प्रभू यांचं तातडीने मुख्य प्रतोद पद रद्द केल्याचं सांगण्यात आलं आहे.

 

नेमकं काय म्हटलं पत्रात?
सरकारवरील भ्रष्टाचाराचे आरोप (Allegations of Corruption), पोलीस बदल्यांमधील घोटाळा (police Transfer Scam), मंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh), नवाब मलिक (Nawab Malik) यासारखे मंत्री जेलमध्ये असल्याने आमचे सदस्य आणि शवसेना पक्षाचे कार्यकर्ते यांना मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागत आहे. तसेच स्थानिक पातळीवर आमची राजकीय प्रतिमा मलिन होत आहे. जे सरकारमध्ये आमच्या सोबत आहेत ते पदाचा दुरुपयोग करुन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना दाबण्याचा प्रयत्न करत आहेत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आमच्या पक्षाच्या म्हणजेच शिवसेनेला वैचारिकदृष्ट्या विरोध करणाऱ्या एनसीपी (NCP) आणि
काँग्रेससोबत (Congress) सरकार स्थापन केल्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे.
आपल्या पक्षाचा कट्टर वैचारिक आधार असलेल्या आणि स्थानिक मराठी लोकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या शिवसेनेच्या तत्त्वांशी तडजोड झाली आहे.
गेली अडीच वर्षे आमचा पक्ष आणि त्यांच्या नेतृत्वाने महाराष्ट्रात सत्ता मिळवण्यासाठी विसंगत विचारसरणीशी जुळवून घेत पक्षाच्या तत्त्वांशी तडजोड केली आहे.

 

आमच्या पक्षाचे नेते बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)
यांनी लोकांना पारदर्शक आणि प्रामाणिक सरकार हिंदुत्ववादी विचारधारेशी तडजोड न करता दिले होते.
मात्र विचारधारेच्या विरोधात जात पक्षाचे नुकसान होत आहे.
2019 मध्ये भाजपसोबत युती बनवून त्यानंतर विचारधारेच्या विरोधात जात काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता बनवली.
त्याचा नकारात्मक परिणाम मतदार आणि शिवसैनिकांमध्ये झाला. याबाबत पक्षनेतृत्वाने दुर्लक्ष केलं.
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेला लक्षात ठेवता भ्रष्ट कारभाराच्या सरकारमध्ये शिवसेनेलाही टीका सहन करावी लागत आहे.

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | eknath shinde revolt letters of shivsena 34 mlas of eknath shinde group to the deputy speaker of the assembly

 

हे देखील वाचा :

Eknath Shinde | मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहनाला एकनाथ शिंदेंचं उत्तर; म्हणाले…

Chitra Wagh | हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून चित्रा वाघ यांची उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाल्या – ‘…यातच तुमचा फोलपणा कळतो’

Eknath Shinde Revolt | ‘स्वाभिमानाने जगू, पण शरणार्थी म्हणून नाही’, शिवसेनेच्या बड्या नेत्याचे सूचक वक्तव्य

 

Related Posts